एक्स्प्लोर
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पुन्हा गारपीट
जालना, बीड, वाशिम, अकोला, बुलडाण्यात गारपीटीसह पाऊस झाला.
मुंबई : मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. मराठवाड्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. जालना, बीड, वाशिम, अकोला, बुलडाण्यात गारपीटीसह पाऊस झाला.
जालन्यात जवळपास 15 मिनिटं गारपिटीचा मोठा मारा झाला. त्यामुळे गारांचा अक्षरश: खच पडल्याचं चित्र बघायला मिळालं. जालना शहरासह अंबड, मंठा तालुक्यातही गारांसह पाऊस झाला. जालन्यात तर सध्या रस्त्यावर गारांचा पांढराशुभ्र खच पडल्याचं चित्र दिसत आहे.
जालना पाऊस आणि गारपीट
बीड जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरातही गारांचा पाऊस झाला. लिंबाच्या आकाराइतक्या गारा पडल्याचं स्थानिक सांगतात. धुळे शहर परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.
बीड गारपीट
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात वाकद, महागाव, बेलखेड परिसरात गारपीट झाली.
वाशिम गारपीट
बुलडाण्यातील चिखली तालुक्यात गारांचा पाऊस झाला असून वादळी वारा सुरु आहे. शेतकऱ्यांच्या हरभरा, कांदा, गहू पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बुलडाणा गारपीट
अकोला जिल्ह्यातील बाळापूर, तेल्हारा, अकोट तालुक्यात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. यामध्ये कांदा, गहू, हरभरा पिकाचं नुकसान झाल्याची शक्यता आहे.
अकोला गारपीट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
क्राईम
राजकारण
Advertisement