एक्स्प्लोर

सदावर्तेंच्या पॅनलचा एसटी बॅंक निवडणुकीत विजय, मान्यताप्राप्त ST कामगार संघटनेचा दारुण पराभव

Gunratna Sadavarte : स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेच्या निवडणुकीत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलने एकतर्फी विजय मिळवला.

Gunratna Sadavarte : स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेच्या (State Transport Co Operative Bank) निवडणुकीत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलने एकतर्फी विजय मिळवला आहे. सदावर्ते यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व 19 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एसटी आंदोलनानंतरही एसटी कर्मचाऱ्यांवर सदावर्तेंची जादू कायम असल्याचं दिसतंय. संदीप शिंदे यांच्या एसटी कामगार संघटनेच्या पॅनलचा सदावर्ते यांच्या पॅनलने दारुण पराभव केलाय.  

गुणरत्न सदावर्ते यांनी स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेवर आपली सत्ता आणण्यासाठी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता. सोबतच ते निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चर्चेत राहिले ते आपल्या विधानांमुळे, कधी मराठा आंदोलनावर भाष्य तर कधी गांधींजींचे मारेकरी नथुराम गोडसेचं समर्थन करताना ते बघायला मिळाले.  एसटी विलिनीकरणाच्या आंदोलनातून एसटी आंदोलनात उडी घेणारे सदावर्ते पहिल्यांदाच कुठल्यातरी निवडणुकीला सामोरे जात होते. अशात एसटी स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेची निवडणूक त्यांच्याकडून लढवण्यात आली. या निवडणुकीत सदावर्ते पॅनलला दणदणीत 19 जागांवर विजय मिळाला. 

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सात पॅनलचे 150 हून अधिक उमेदवार आपलं नशीब आजमावत होते. निवडणुकीत उतरलेल्या एसटीतील सर्वच संघटनांकडून महाराष्ट्रभर जोरदार प्रचार करण्यात आला. मात्र, खरी चुरस गुणरत्न सदावर्ते पॅनल आणि शरद पवार पुरस्कृत संदीप शिंदे यांच्या कामगार संघटनेच्या पॅनलमध्ये बघायला मिळाली. सोबतच एसटी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या गोपीचंद पडळकर यांची सेवाशक्ती संघर्ष संघटना देखील ह्या निवडणुकीत आपलं नशीब आजमावत होती. मात्र, ह्या निवडणुकीत त्यांना सपशेल अपयश आल्याचं पाहायला मिळालं. 

जवळपास काही वर्षांपासून कामगार संघटनेचं स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेवर वर्चस्व होतं. ज्यात कामगार संघटना बॅंकेच्या संचालकपदावर असताना भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. गुणरत्न सदावर्तेंसोबतच गोपीचंद पडळकर यांनी देखील प्रचारादरम्यान शरद पवारांवर निशाणा साधला. 

मात्र, एसटी आंदोलनानंतर ह्या बॅंकेवर कोणाची सत्ता येईल यासंदर्भात मोठी उत्सुकता होती. एसटी आंदोलनामुळे जसं सर्वसामान्यांचे नुकसान झाले तसे ते बॅंकेचे देखील झाले. एसटी विलिनीकरणासंदर्भात सदावर्ते हे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून भाष्य करत नाहीत. मात्र, तरीही जे मागील काही वर्षांपासून सत्तेत असलेल्यांना जमलं नाही ते सदावर्तेंनी करुन दाखवलं. गुणरत्न सदावर्तेयांच्या एसटी कष्टकरी संघटनेचं एसटी महामंडळात वर्चस्व वाढतंय. अशात एसटी बॅंकेवर देखील एकहाती सत्ता मिळवल्याने सदावर्ते यांचं एसटी कर्मचाऱ्यांवरचं गारूड अजूनही कायम असल्याचं दिसतंय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget