Gujarat Air India Plane Crash: आयुष्यात पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणाऱ्या पवार दाम्पत्याचा मृत्यू; मुलाला भेटण्यासाठी निघाले होते लंडनला!
Gujarat Air India Plane Crash: पहिल्यांदाच विमानात बसून प्रवास करत आपल्या मुलाला भेटण्यासाठी निघालेले आई-वडील आशाताई आणि महादेव पवार या अपघातात मृत्युमुखी पडले आणि पवार कुटुंबावर शोककळा पसरली.

Gujarat Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे 12 जून झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात (Air India Plane Crash Gujarat) 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील 16 जणांचा अहमदाबाद अपघातात मृत्यू झाला आहे. यात मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल यांच्यासह दीपक पाठक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, अपर्णा महाडिक, साईनीता चक्रवर्ती, इरफान शेख या क्रू मेंबर्सचा समावेश आहे. त्याशिवाय मयूर पाटील, यशा कामदार, आशा पवार, महादेव पवार या प्रवाशांचाही समावेश आहे.
आयुष्यात पहिलाच विमान प्रवास, धाकट्या मुलाला लंडनला जाऊन भेटण्याची आई-वडिलांची ओढ, मात्र पवार कुटुंबावर काळाचा घाला झाला. धाकट्या मुलाला लंडनला भेटण्यासाठी निघालेले मूळ सांगोल्याचे असलेले महादेव पवार आणि आशाताई पवार यांचा अहमदाबाद विमान अपघात मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
गुरुवारी आमदाबादमध्ये विमान अपघात झाला आणि या अपघातामध्ये आपल्या धाकटा मुलगा शैलेश याला भेटण्यासाठी मूळ महाराष्ट्रातील सांगोल्याचे असलेले महादेव पवार आशा पवार हे शैलेश यांचे आई वडील लंडनला जायला निघाले. आपला थोरला मुलगा रमेश यांनी आपल्या आई-वडिलांना विमानतळावर सोडलं. विमानात बसल्यावर आई-वडिलांसोबत व्हिडीओ कॉलवर संवाद साधला. मात्र वीस मिनिटानंतर ज्या विमानात आई-वडील होते. त्याच विमानाचा अपघात झाल्याची बातमी कानावर आली. पहिल्यांदाच विमानात बसून प्रवास करत आपल्या मुलाला भेटण्यासाठी निघालेले आई-वडील आशाताई आणि महादेव पवार या अपघातात मृत्युमुखी पडले आणि पवार कुटुंबावर शोककळा पसरली.
विमान अपघातात पिंपरीतील इरफान शेखचा मृत्यू-
गुजरातच्या अहमदाबाद मध्ये झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात इरफान शेख या 22 वर्षीय क्यू मेंबरचा ही दुरदैवी अंत झाला. इरफान हा पिंपरी चिंचवड च्या संत तुकाराम नगर मध्ये राहायला होता. आजी आजोबा आई वडील भाऊ अस कुटुंब असलेला इरफान दोन वर्षापासून एअर इंडिया मध्ये कामाला लागला होता. अत्यंत मनमिळावू असलेला इरफान नुकताच ईद साठी घरी ही येऊन गेला होता. त्याच्या जाण्याने त्यांच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे.त्याचा मृतदेह लवकरात लवकर मिळावा अशी मागणी त्याचे नातेवाईक करत आहेत.
























