(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 02 एप्रिल 2022 : शनिवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दोन वर्षांनंतर राज्यात निर्बंधमुक्त गुढीपाडव्याचा उत्साह, ठिकठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रम
वागुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पंढरीत विठुरायाच्या चरणावर माथा; थेट दर्शन आजपासून, तुळजापुरातही उभारली गुढी
गुढीपाडव्याच्या मुहूर्तासाठी बाजारपेठा सज्ज, सोनं, वाहन आणि घर खरेदीला ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष, निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंच्या घोषणेची उत्सुकता
Raj Thackeray Gudi Padwa sabha : दोन वर्षांनंतर मनसेचा गुढीपाडवा (Gudi Padwa) मेळावा आज मुंबईच्या शिवाजी पार्कवर (Mumbai Shivaji Park) पार पडणार आहे. राज ठाकरे यावेळी मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. याच मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात येतेय. मनसे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांनी या तयारीचा आढावा घेतलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 9 मार्चला मनसेच्या 16 व्या वर्धापन दिनी राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, तो 2 एप्रिलला शिवतीर्थावर दाखवेन" असं सूचक वक्तव्य राज यांनी केलं होतं. शिवाय या मेळाव्याचा एक टीझरही मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार, राज ठाकरे कोणती घोषणा करणार याकडे लक्ष लागलं आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च रोजी पुण्यात झालेल्या मनसेच्या सोळाव्या वर्धापनदिनी बोलताना आजचं भाषण केवळ ट्रेलर आहे, 2 एप्रिलला शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळाव्यात पूर्ण पिक्चर असेल, असं म्हटलं होतं. त्यानंतरच राज ठाकरेंच्या आज पार पडणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आज गुढीपाडवा आहे. या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळवा होणार आहे. सभेला संपूर्ण राज्यातून मनसैनिकांना उपस्थित राहण्याचे आदेश पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात दिले होते. त्यामुळे आज प्रचंड गर्दी शिवाजी पार्कात होण्याची शक्यता आहे. यासाठी तयारी देखील जोरदार सुरु आहे.
गुढीपाडव्याला राज्य सरकारचं मुंबईकरांना मोठं गिफ्ट, मुख्यमंत्री मेट्रो-2 ए आणि मेट्रो 7ला हिरवा झेंडा दाखवणार, फडणवीसांना आमंत्रण नाही
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू, हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू झाल्याची माहिती
ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी नाशिकमध्ये पेट्रोल पंप बंद, विना हेल्मेट पेट्रोल न विकण्याच्या पोलीस आयुक्तांच्या निर्णयाला विरोध
श्रीलंकेत आणीबाणी घोषित, देश आर्थिक संकटात सापडल्यानं जनतेचा रोष अनावर, राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी
शरद पवार आज सांगली दौऱ्यावर, कार्यक्रमासाठी अर्धे मंत्रिमंडळही सांगलीत, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाचे लोकार्पण होणार
आयपीएलमध्ये आज डबल धमाका, मुंबई राजस्थानशी भिडणार तर गुजरातची दिल्लीसोबत लढत