Gudi padwa 2022 Live : मनसेप्रमुख राज ठाकरेंनी उभारली गुढी; 'शिवतीर्था'वर सणाचा उत्साह
Gudi Padwa 2022 : हिंदू धर्मात गुढीपाडवा (Gudi Padwa 2022) या सणाला फार महत्त्व आहे. यंदाचा गुढीपाडवा निर्बंधमुक्त होणार असल्याने राज्यभरात नव्या वर्षाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय.
LIVE
Background
Gudi Padwa 2022 : गुढीपाडवा (Gudi Padwa 2022) हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला फार महत्त्व आहे. यंदाचा गुढीपाडवा निर्बंधमुक्त होणार असल्याने राज्यभरात नव्या वर्षाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मागील दोन वर्ष कोरोनामुळे गुढीपाडवा साडरा करण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. घरोघरी गुढी उभारुन नववर्षाची सुरुवात केली जाते. खरेदी करता बाजारातही मोठी लगबग पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी शोभायात्रा निघतात. मुंबई आणि पुण्यातील शोभायात्रांची शान काही वेगळीच असते.
पाडव्याच्या मुहूर्तावर साई पालख्यांचे प्रस्थान
गेले दोन वर्ष कोरोनामुळे साई भक्तांना साई पालखी काढता आल्या नाहीत. मात्र यंदा महाराष्ट्रात कोरोनाचे संकट कमी झाल्याने सरकारने निर्बंध उठवले आहेत. यामुळे शेकडोच्या संख्येने राज्यभरातील साईभक्त साई पालखीत पुन्हा शामिल झाले आहेत. पुढील दहा दिवस हे साई भक्त पायी शिर्डीला पोहचणार आहेत. साईभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. विविध देखावे, साई पालखीसह साई नामाचा जयघोष करीत हे साईभक्त शिर्डीला रवाना झाले आहेत.
मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार
दोन वर्षांनंतर मनसेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. राज ठाकरे यावेळी मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. याच मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात येतेय. मनसेच्या 16 व्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी ''हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, तो 2 एप्रिलला शिवतीर्थावर दाखवेन" असं सूचक वक्तव्य राज यांनी केलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Aryan Khan Case : मोठी बातमी! मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला आहे.
- Coronavirus : भारताला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका? IIT कानपूरच्या प्राध्यापकांचा 'हा' मोठा दावा, काय म्हणाले जाणून घ्या?
- Supreme Court : अबब! केंद्र आणि राज्य सरकारांशी संबंधित 35000 हून अधिक प्रकरणं सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित
- Odisha : प्रेमीयुगुलाच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या डिलीव्हरी बॉयची तरुणीला बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
[yt]https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA[/yt]
Raj Thackeray on Farmer sucide : शेतकऱ्याच्या हत्या अद्याप संपलेल्या नाहीत : राज ठाकरे
Raj Thackeray on Farmer sucide : शेतकऱ्याच्या हत्या अद्याप संपलेल्या नाहीत. रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागणार नये, हा खरा राज्यकर्ता असतो. असे छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटले आहे. परंतु आता आमच्याकडे शेतकरी सर्वात जास्त आत्महत्या करत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप, शिक्षणाचा बट्ट्याबोळ सुरू आहे.
Raj Thackeray on Sachin Waze : सचिन वाझेने अंबानीच्या घरासमोर बॉम्ब ठेवला : राज ठाकरे
Raj Thackeray on Sachin Waze : सचिन वाझे शिवसेनेत होते त्यांनी अंबानीच्या घरासमोर बॉम्ब ठेवला. परंतु त्याचे उत्तर आजपर्यंत उत्तर देशाला आजपर्यंत मिळाले नाही. जनता सगळा विसरते आणि याचा फायदा घेतला जातो. मूळ विषय बाजूला ठेवला जातो. जगातील सर्वात मोठ्या उद्योजकांच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्याची हिम्मत कशी होते.
धनंजय मुंडे यांनी गुढीपाडव्यानिमित्त घेतले प्रभू वैद्यनाथाचे सपत्नीक दर्शन
मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून जनतेला गुढी पाडवा व मराठी नव वर्षाच्या शुभेच्छा
MNS Gudi padwa sabha : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा ऐकण्यासाठी मनसे कार्यकर्ते शिवाजी पार्कवर जमा व्हायला सुरुवात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा ऐकण्यासाठी हळूहळू मनसे कार्यकर्ते शिवाजी पार्कवर जमा होण्यासाठी सुरुवात झाली आहे. 'राजतिलक की करो तैयारी आ रहे हैं भगवा धारी' अशा पद्धतीचे पोस्टर देखील झळकले आहेत