एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तुळजापूर बलात्कार प्रकरण, पीडितेचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील 7 वर्षीय बलात्कार पीडितेचा संपूर्ण वैद्यकीय खर्च राज्य सरकार करणार आहे. योग्य त्या रुग्णालयात पीडितेवर तातडीने उपचार व्हावेत, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत
उस्मानाबादः उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील 7 वर्षीय बलात्कार पीडितेचा संपूर्ण वैद्यकीय खर्च राज्य सरकार करणार आहे. योग्य त्या रुग्णालयात पीडितेवर तातडीने उपचार व्हावेत, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
संबंधित बातमीः उस्मानाबादेत दुसरीतील विद्यार्थिनीवर 15 वर्षीय मुलाचा बलात्कार
तुळजापुरात 16 तारखेला सातवीत शिकणाऱ्या चिमुरडीवर 15 वर्षीय मुलाने बलात्कार केला. यानंतर पीडितेच्या कुटुंबाकडे मुलीच्या उपचारासाठीही पैसे नव्हते. ही बातमी 'माझा'ने दाखवल्यानंतर पीडितेच्या कुटुंबाला पुढील उपचारासाठी मदतीचा ओघ सुरु झाला.पाहा बातमीचा व्हिडिओः तुळजापूर : 7 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार, उपचारासाठी परवड
महिला बालविकास विभागाचं देखील सत्य या घटनेनंतर उजेडात आलं. सरकारच्या 'मनोधैर्य' या योजनेमार्फत महिला पीडितांना अर्थसहाय्य दिलं जातं. मात्र महिला बालविकास विभागाच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं समोर आलं.संबंधित बातमीः 'निर्भया'साठी महिला बालविकास विभागाच्या तिजोरीत खडखडाट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement