(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यपालांच्या दौऱ्यात जोरदार निदर्शनं; वक्तव्याविरोधात आंदोलन, सोलापुरात पोलीस छावणीचे स्वरुप
Governor Bhagat Singh Koshyari In Solapur : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज सोलापूर दौऱ्यावर असताना विमानतळ, आसरा चौक, विवेकानंद केंद्र या भागाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
Governor Bhagat Singh Koshyari In Solapur : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्यपाल पुन्हा वादात सापडले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर विमानतळ, आसरा चौक , विवेकानंद केंद्र या भागाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं शिवप्रेमींनी राज्यपालांच्या निषेधाची भूमिका घेतली आहे. दरम्यान निदर्शनं करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आज सकाळपासून शिवप्रेमी मोठ्या संख्येने राज्यपाल जाणार असलेल्या आसरा चौकात जमा झाले होते. भगवे झेंडे घेतलेले हे आक्रमक आंदोलकांना पोलीस प्रशासनाने आसरा चौकात अडवून ठेवले आहे. यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला असून ड्रोन द्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. राज्यपालांचा पहिला कार्यक्रम विवेकानंद केंद्राच्या वेदांतिक ॲप्लिकेशन ऑफ योग ॲन्ड मॅनेजमेंट प्रकल्पाचे लोकार्पण राज्यपालांच्या हस्ते होणार आहे.
राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापुरातील शिवप्रेमींना रोखण्यासाठी काही मार्ग वाहतुकीस बंद केल्याने सर्वसामान्य नागरिकांना माणसांना सोसावा लागत आहे. विमानतळाबाहेर पंधरा ते वीस हजार शिवप्रेमी जमणार असल्याचा दावा शिवप्रेमींनी केला जात आहे. यावेळी ग्रामीण भागात देखील रस्ता रोको आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. जवळपास दीड हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त सोलापूर शहरात असेल. यामध्ये 3 पोलिस उपायुक्त, 9 सहाय्यक पोलिस आयुक्त, 26 पोलिस निरीक्षक, 73 सहायक पोलिस निरीक्षक, एक हजार 62 पोलिस कर्मचारी, 400 होमगार्ड, 2 राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत.