एक्स्प्लोर

एकही योजना बंद करणार नाही, दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विधानसभेत शब्द

CM Devendra Fadnavis : जनतेला आम्ही जी जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केलं.

CM Devendra Fadnavis : जनतेला आम्ही जी जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केलं. तसेच ज्या ज्या योजना आम्ही सुरु केल्या आहेत, त्यातील एकही योजना (Yojana) बंद होऊ देणार नसल्याचे आश्वासन देखील फडणवीसांनी दिले. ते विधानसभेत बोलत होते. लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं आहे. लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर त्यांच्या खात्यावर टाकणार असल्याचेही फडणवीसांनी सांगितले.

लाडक्या बहिण योजनेच्या बाबतीत नवीन निकष नाहीत

लाडक्या बहिण योजनेच्या बाबतीत नवीन निकष काही नाहीत. योजना चुकीच्या पद्धतीनं वापरत असेल तर ते तपासणं गरजेचं आहे. कारण हा जनतेचा पैसा असल्याचे फडणवीस म्हणाले. समाजात चांगल्या प्रवृत्तीसारख्याच वाईट प्रवृत्ती देखील असल्याचे फडणवीस म्हणाले. आम्ही शेतकरी असतील, युवा असतील, वंचितांच्या संदर्भातील योजना असतील, ज्येष्ठांच्या संदर्भातील सर्व आश्वासने पूर्ण करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.  

मला शरद पवारसाहेबांचं आश्चर्य वाटलं

मारकडवाडीच्या मुद्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मला बाकीच्यांचे काहीही आश्चर्य वाटलं नाही, पण शरद पवारसाहेबांचं आश्चर्य वाटल्याचे फडणवीस म्हणाले. काँग्रेसने अनेकदा ईव्हीएमचा मुद्दा मांडला होता. पण शरद पवारसाहेबांनी यापूर्वी कधीही EVM चा मुद्दा मांडला नव्हता असले फडणवीस म्हणाले. यावेळी मात्र, पवारसाहेब असं म्हणाले की, छोटी राज्य आण्ही जिंकतो आणि मोठी राज्य हे जिंकतात. कर्नाटक, पश्चिम बंगाल ही छोटी राज्ये आहे का? असा सवाल फडणवीसांनी केला. मारकडवाडीत राम सातपुते यांनी जास्त मते मिळाल्यानंतर लोकांना धमकावण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. लोकांना धमकावलं होतं की, आपल्याला इथं बॅलेटवर मतदान घ्यायचं आहे, यामध्ये मतदान शरद पवार यांच्या पार्टीला मिळायला पाहिजे असं सांगितलं होतं. पण दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. जनतेनं आम्हाला दिलेलं बहुमत स्वीकारा. जनतेनं आम्हाला जो अधिकार दिला आहे. त्याचा अपमान करु नका असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

मराठीला प्रथम राजभाषेचा दर्जा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला

मराठीला प्रथम राजभाषेचा दर्जा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यानंतर मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचे फडणवीस म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं भाषेच्या विकासासाठी भाषा भवन उभारणे, भाषेच्या प्रसारासाठी निधी मिळणार, मराठी भाषेतील विद्वानांसाठी केंद्र सरकारच्या वतीनं दोन पुरस्कार देण्यात येणार आहे. 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Shami : रोजा न ठेवणारा मोहम्मद शमी गुन्हेगार, तो शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार; मौलानाच्या वक्तव्याने क्रिकेटप्रेमी संतापले!
रोजा न ठेवणारा मोहम्मद शमी गुन्हेगार, तो शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार; मौलानाच्या वक्तव्याने क्रिकेटप्रेमी संतापले!
PM Kisan चे पैसे येताच मेसेज, लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्यांचे पैसे उडाल्याच्या घटना, नव्या स्कॅमने डोकेदुखी!
PM Kisan चे पैसे येताच मेसेज, लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्यांचे पैसे उडाल्याच्या घटना, नव्या स्कॅमपासून कसा बचाव कराल?
Ashish Shelar on Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊ म्हणाले, चुकून मी देखील काळ मंत्री होतो, पण मंत्री आशिष शेलारांना भाऊंची खदखद बोचली अन् म्हणाले, 'सुधीर भाऊ तुम्ही...'
सुधीरभाऊ म्हणाले, चुकून मी देखील काळ मंत्री होतो, पण मंत्री आशिष शेलारांना भाऊंची खदखद बोचली अन् म्हणाले, 'सुधीर भाऊ तुम्ही...'
Nashik Godavari Pollution : नाशिकच्या गोदामाईचं नदीपात्र की क्रिकेटचं हिरवगार मैदान? पानवेलींनी नदीचा श्वास कोंडला, प्रदूषणाचे भीषण वास्तव समोर, पाहा PHOTOS
नाशिकच्या गोदामाईचं नदीपात्र की क्रिकेटचं हिरवगार मैदान? पानवेलींनी नदीचा श्वास कोंडला, प्रदूषणाचे भीषण वास्तव समोर, पाहा Photos
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhaskar Jadhav Vs Devendra Fadanvis | भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावरुन घमासान,जाधवांचा संताप, मुख्यमंत्री काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 06 March 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सNeelam Gorhe News | नीलम गोऱ्हेंच्या विरोधात विधानपरिषदेत अविश्वास ठराव, उद्धव ठाकरे काय म्हणालेDevendra Fadanvis On Abu Azmi | अबू आझमींना 100 टक्के जेलमध्ये टाकणार, फडणवसांचं विधान; तर आझमींना 2-3 दिवसात चौकशीसाठी पोलीस बोलावणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Shami : रोजा न ठेवणारा मोहम्मद शमी गुन्हेगार, तो शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार; मौलानाच्या वक्तव्याने क्रिकेटप्रेमी संतापले!
रोजा न ठेवणारा मोहम्मद शमी गुन्हेगार, तो शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार; मौलानाच्या वक्तव्याने क्रिकेटप्रेमी संतापले!
PM Kisan चे पैसे येताच मेसेज, लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्यांचे पैसे उडाल्याच्या घटना, नव्या स्कॅमने डोकेदुखी!
PM Kisan चे पैसे येताच मेसेज, लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्यांचे पैसे उडाल्याच्या घटना, नव्या स्कॅमपासून कसा बचाव कराल?
Ashish Shelar on Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊ म्हणाले, चुकून मी देखील काळ मंत्री होतो, पण मंत्री आशिष शेलारांना भाऊंची खदखद बोचली अन् म्हणाले, 'सुधीर भाऊ तुम्ही...'
सुधीरभाऊ म्हणाले, चुकून मी देखील काळ मंत्री होतो, पण मंत्री आशिष शेलारांना भाऊंची खदखद बोचली अन् म्हणाले, 'सुधीर भाऊ तुम्ही...'
Nashik Godavari Pollution : नाशिकच्या गोदामाईचं नदीपात्र की क्रिकेटचं हिरवगार मैदान? पानवेलींनी नदीचा श्वास कोंडला, प्रदूषणाचे भीषण वास्तव समोर, पाहा PHOTOS
नाशिकच्या गोदामाईचं नदीपात्र की क्रिकेटचं हिरवगार मैदान? पानवेलींनी नदीचा श्वास कोंडला, प्रदूषणाचे भीषण वास्तव समोर, पाहा Photos
Satish Bhosale : अंगावर सोनं, कारमध्ये नोटांची बंडलं, डोळ्यावर गॉगल! बीडमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या भाजप पदाधिकारी सतीश भोसलेचे PHOTOS व्हायरल
अंगावर सोनं, कारमध्ये नोटांची बंडलं, डोळ्यावर गॉगल! बीडमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या भाजप पदाधिकारी सतीश भोसलेचे PHOTOS व्हायरल
भैय्याजी जोशींनी वक्तव्य प्रत्येक मराठी माणसाने ऐकावं, आज कळलं असेल बुलेट ट्रेन कोणासाठी; घाटकोपरची भाषा गुजराती म्हणणाऱ्या भैय्याजींवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
भैय्याजी जोशींनी वक्तव्य प्रत्येक मराठी माणसाने ऐकावं, आज कळलं असेल बुलेट ट्रेन कोणासाठी; घाटकोपरची भाषा गुजराती म्हणणाऱ्या भैय्याजींवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Tesla : टेस्लाचं भारतातील पहिलं शोरुम मुंबईत सुरु होणार, बीकेसीतील जागेचं महिन्याला 35 लाख रुपये भाडं अन् 2 कोटी डिपॉझिट
टेस्लाचं भारतातील पहिलं शोरुम मुंबईत सुरु होणार, बीकेसीतील जागेचं महिन्याला 35 लाख रुपये भाडं अन् 2 कोटी डिपॉझिट
Video : आलिशान कारच्या डॅशबोर्डवर फेकली 500 अन् 200 च्या नोटांची बंडलं; अंजली दमानियांकडून सतीश भोसलेचा नवा व्हिडिओ शेअर; म्हणाल्या...
आलिशान कारच्या डॅशबोर्डवर फेकली 500 अन् 200 च्या नोटांची बंडलं; अंजली दमानियांकडून सतीश भोसलेचा नवा व्हिडिओ शेअर; म्हणाल्या...
Embed widget