एक्स्प्लोर
Advertisement
शहीद जवान सुनील काळे यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी, सरकारकडून ग्वाही
पुलवामा येथील अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या सुनिल काळे यांच्या कुटुंबातील एकाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत घेण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली
सोलापूर : पुलवामा येथील अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या सुनिल काळे यांच्या कुटुंबातील एकाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत घेण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पानगाव (ता. बार्शी) येथे शहीद काळे यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन देशमुख, टोपे, भरणे यांनी आज सांत्वन केले.
शहीद काळे यांची भाची वर्षा काळे यांनी कुटुंबाबाबत माहिती दिली. काळे कुटुंबीय जिरायती शेतीवर अवलंबून आहे. मामीला आधार देण्यासाठी कोणी नाही, एकाला शासकीय सेवेत घेण्याची तिने मागणी केली होती. यावर देशमुख म्हणाले, आम्हाला शहीद काळे यांचा अभिमान आहे. शासन खंबीरपणे कुटुंबाच्या पाठिशी आहे.
वीर जवानाचा आम्हाला अभिमान असून काळे कुटुंबाला लागेल ती मदत शासन करेल, असे भरणे यांनी आश्वस्त केले. शासकीय मदतीबरोबर खास बाब म्हणून काळे कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत घेण्याचा प्रयत्न शासन करेल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी शहीद जवान सुनील काळे यांच्या आई कुसुम काळे, पत्नी अर्चना, मुले श्री आणि आयुष, भाऊ नंदकुमार आणि किरण उपस्थित होते.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील बंदजू परिसरात मंगळवारी (23 जून) पहाटे दहशतवाद्यांशी चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. मात्र दहशतवाद्यांशी लढताना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगावमधील सुनील दत्तात्रय काळे (वय 41 वर्ष) शहीद झाले. काळे यांच्या निवृत्तीला काहीच महिने शिल्लक होते मात्र त्यांनी आपली सेवा वाढवून घेतली होती. तसंच त्यांची बदली देखील दिल्लीला झाली होती. मात्र ते लॉकडाऊनमुळे ते तिकडं जाऊ शकले नाहीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement