एक्स्प्लोर
Advertisement
सरकार आमचे तरीही शिवसेनेवर अन्याय होतोय : शिवाजी आढाळराव पाटील
पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मरगळ आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुरघोडी करत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे आढळराव पाटील म्हणाले आहे.
पिंपरी : महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आमचे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेवर अन्याय करत आहे, असा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतलं. यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. आढाळराव पाटील म्हणाले, पालकमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अन्यायापेक्षा कुरघोडी करत आहेत. शिवसेनेचा सध्या एक ही मोठा नेता विधानसभेत नसल्याने ते आमची कामं अडवू पाहत आहेत. खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या सांगण्यावरून हे सर्व सुरू आहे.
Shivaji Adhalrao Patil | सरकार आमचं असलं तरी मावळात शिवसेनेवर अन्याय : आढाळराव पाटील
राजगुरूनगर खेड पंचायत समितीच्या इमारतीचे काम पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी ते काम थांबवलं, शिवसेनेने भूमिपूजन केलेलं कामाला आडकाठी घातल्याचा आरोप आढळराव पाटील यांनी केला. त्यामुळं शिवसेनेला पुणे जिल्ह्यात संघर्ष करावा लागतोय, ही संपूर्ण बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कानावर घातल्याचे ही आढळरावांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात पक्षप्रमुख आम्हाला बळ देतील असा विश्वास देखील आढाळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.
आढाळराव पाटील म्हणाले, राज्यसभेसाठी माझं नाव चर्चेत नव्हतं. उलट मीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना भेटून मी इच्छुक नसल्याचं आणि माझा अजिबात विचार करू नये असं आधीच सांगितलं होतं. कारण मी मैदानावर, रणांगणावर लढणारा शिवसैनिक आहे. असं स्वतःहून सांगितल्याने ठाकरे साहेबांनी माझं कौतुक ही केलं होतं. त्यामुळं राज्यसभेसाठी मला उमेदवारी न दिल्याचा आणि नाराज होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
संबंधित बातम्या :
महाविकास आघाडीमधील राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादीच्या खात्यात
स्मशानात जाईपर्यंत शिवसैनिकच राहील; राज्यसभेसाठी संधी न मिळाल्यानं चंद्रकांत खैरे यांची खदखद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement