एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana: घपला होताच सरकार सावध, लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मची आता कसून तपासणी होणार; सॉफ्टवेअरही बदलणार?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत अनेक गैरप्रकार समोर येऊ लागले आहेत, या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता सरकारकडून कठोर पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे: राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेचीच चर्चा सर्वत्र दिसून येत आहे, अशातच या योजनेच्या बाबतीत काही गैरप्रकार होत असल्याचं देखील समोर आलं आहे. काही पुरूषांनी महिलांच्या नावे आपले अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. तर काही ठिकाणी लाडकी बहिण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ घेण्यासाठी आपल्या बायकोचे 26 अर्ज दाखल केल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता सरकारकडून कठोर पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

सप्टेंबरमध्ये येणाऱ्या अर्जाची कडक तपासणी करण्याचा निर्णय

लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) आता महिला व बालविकास विभागाकडून मुदत वाढवलेल्या चालू महिन्यात म्हणजेत सप्टेंबर महिन्यामध्ये भरल्या जाणाऱ्या अर्जाची कडक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात या योजनेसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये काही बदल किंवा काही अपडेट करता येईल का जेणेकरून गैरप्रकारांना आळा बसेल असा विचार देखील सुरू आहे, अशी माहिती समोर आली आहे. 

सातारा जिल्ह्यात अनेक बनावट अर्ज भरल्याचे निर्दशनास आल्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे, त्याचबरोबर अर्जाबाबत होणारे गैरप्रकर आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा विभागाकडून देण्यात आलेला आहे.

एका महिलेच्या नावाने वेगवेगळ्या आधार क्रमांकाद्वारे सुमारे 30 अर्ज 

सातारा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) एकाच महिलेने वेगवेगळ्या प्रकारे अनेक अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. साताऱ्यातील एका महिलेच्या नावे वेगवेगळ्या आधार क्रमांकाद्वारे सुमारे 30 अर्ज दाखल केल्याचा धक्कादायर प्रकार उघडकीस आला आहे. महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. यानंतर विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या आदेशानुसार विभागाने संबंधिताच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. 

आता राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) अर्ज भरण्यासाठीची राज्य सरकारने ताराख वाढवून दिली आहे. योजनेचा अर्ज करण्यासाठी आणखी एका महिन्याची मुदत वाढविली आहे. चालू सप्टेंबर महिन्याच्या 30 तारखेपर्यंत या योजनेसाठी महिला अर्ज करू शकतात. त्यामुळे आता पुन्हा एकदा या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढे चौकशी काटेकोर केली जाणार आहे, अशी माहितीही यावेळी महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.

साताऱ्यातील घटनेबाबात माहिती देताता नारनवरे म्हणाले, साताऱ्यातील एका महिलेने अनेकदा बनावट अर्ज दाखल करून सरकारची फसवणूक केली आहे. अर्ज तपासण्याच्या सॉफ्टवेअरमध्ये आणखी काही बदल करता येईल का, याचा गांभीर्याने विचार केला जात आहे. आता येणाऱ्या प्रत्येक अर्जाची छाननी केली जाईल. ते तपासले जातील, आधार क्रमांक कोणत्या बँकेशी लिंक आहे, याचीही चौकशी केली जाणार आहे. तालुका, जिल्हा तसेच जिल्हा प्रशासनाकडून अर्जाची पुन्हा तपासणी करण्याशिवाय आणखी काही निकषांद्वारे अर्जाची तपासणी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी पठ्ठ्यानं बायकोचे भरले 26 फॉर्म

एका पठ्ठ्यानं आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 26 फॉर्म भरले आहेत. ह घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. गणेश घाडगे असं या व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी फसवणुकीच्या आरोपाखाली पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे.  खारघरमध्ये राहणाऱ्या पूजा महामुनीचा फॉर्म पुन्हा फेटाळला जात असताना फसवणुकीचे प्रकरण समोर आले. यानंतर भाजपचे माजी नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी याबाबत तक्रार केली होती. दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सातारा येथील गणेश घाडगे या व्यक्तीने संपूर्ण नियोजन करून त्याची पत्नी प्रतीक्षा पोपट जाधव उर्फ ​​प्रतीक्षा गणेश गावडे हिच्या नावे 26 फॉर्म भरले. लाडली बहिण योजनेचे फॉर्म भरताना नातेवाइकांना न कळवता त्यांचे आधारकार्ड वापरुन फसवणूक केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Babanrao Taywade OBC : आश्वासनाला तडा गेल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर : बबनराव तायवाडेDhule Suicide Case : धुळ्यात एका कुटुंबातील चौघांची आत्महत्या, कारण स्पष्ट नाहीNagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलनBuldhana CM Eknath Shinde Welcome : बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांचं स्वागत, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Embed widget