Ladki Bahin Yojana: धक्कादायक! लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी पठ्ठ्यानं बायकोचे भरले 26 फॉर्म, किती मिळाले पैसे?
लाडकी बहिण योजनेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एका पठ्ठ्यानं आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 26 फॉर्म भरले आहेत.
Ladki Bahin Yojana: राज्यात सध्या लाडकी बहिण योजनेची (Ladki Bahin Yojana) जोरदार चर्चा सुरु आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले आहेत. अनेक महिलांना या योजनांचा लाभ देखील महिलांना मिळाला आहे. दरम्यान, अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एका पठ्ठ्यानं आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 26 फॉर्म भरले आहेत. ह घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. गणेश घाडगे असं या व्यक्तीचं नाव आहे.
फसवणुकीच्या आरोपाखाली पती-पत्नीला अटक
दरम्यान, याप्रकरणी फसवणुकीच्या आरोपाखाली पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे. खारघरमध्ये राहणाऱ्या पूजा महामुनीचा फॉर्म पुन्हा फेटाळला जात असताना फसवणुकीचे प्रकरण समोर आले. यानंतर भाजपचे माजी नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी याबाबत तक्रार केली होती. दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सातारा येथील गणेश घाडगे या व्यक्तीने संपूर्ण नियोजन करून त्याची पत्नी प्रतीक्षा पोपट जाधव उर्फ प्रतीक्षा गणेश गावडे हिच्या नावे 26 फॉर्म भरले. लाडली बहिण योजनेचे फॉर्म भरताना नातेवाइकांना न कळवता त्यांचे आधारकार्ड वापरुन फसवणूक केली.
अधिक पैसे कमावण्याच्या लालसेपोटी पत्नीच्या नावावर भरले अनेक फॉर्म
गणेश हा व्यवसायाने भिवंडीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना आणली होती, ज्यामध्ये त्यांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार होते. मात्र, फसवणूक करण्याच्या उद्देशाने गणेशने अधिक पैसे कमावण्याच्या लालसेपोटी पत्नीच्या नावावर आणखी फॉर्म भरण्याचा घाट घातला होता.
नेमका कसा घडला प्रकार?
गणेशने पत्नीच्या नावावर लाडकी बहिण योजनेचे अनेक फॉर्म भरले.
यासाठी गणेशने इंटरनेट आणि त्याच्या ओळखीच्या लोकांच्या आधारकार्डचा वापर केला.
एवढेच नाही तर त्याने वेगवेगळ्या अँगलमधून स्वतःच्या पत्नीचे फोटो काढले.
सर्व फॉर्म भरण्यासाठी गणेशने आपल्या पत्नीच्या सासरच्या आणि माहेरच्या नावाचा वापर केला.
गणेशने या सर्व फॉर्मशी फक्त एक बँक खाते लिंक केले पण त्याला फक्त एकाच फॉर्ममधून म्हणजे 3 हजार रुपये मिळाले.
उर्वरित फॉर्मची प्रक्रिया सुरू असल्याने पैसे आले नाहीत.
कसा आला प्रकार उघडकीस?
खारघरमध्ये राहणाऱ्या पूजा महामुनी या महिलेचा वारंवार अर्ज नाकारण्यात येत होता. बनावट माध्यमातून अर्ज केल्याचे प्रकरण समोर आले होते. यानंतर भाजपचे माजी नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी याबाबत तक्रार केली. पूजा महामुनी यांचे आधार कार्ड वापरून कोणीतरी आधीच अर्ज भरल्याचे तपासात समोर आले आहे. हा बनाव उघडकीस आल्यानंतर सातारा पोलिसांनी पती-पत्नी दोघांनाही अटक केली. यानंतर न्यायालयाने दोघांनाही 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आता यामध्ये आणखी कोणी सामील आहे का? किंवा फक्त पती-पत्नीने मिळून हा गेम तयार केला आहे का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या: