एक्स्प्लोर
'शिवप्रहार'च्या अध्यक्षांवर हल्ला करणारा गोरख दळवी जेरबंद
अहमदनगर : शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांच्यावर अहमदनगरमध्ये हल्ला करणारा मुख्य आरोपी जेरबंद झाला आहे. भोर यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी गोरख दळवीला पोलिसांनी अटक केली आहे.
अहमदनगर शहरात येताना सापळा रचून गोरख दळीवीला पोलिसांनी अटक केली. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई दळवीवर अटकेची कारवाई केली. या प्रकरणी आतापर्यंत पाच जण अटकेत आहेत.
अभिजीत गुंजाळ, अमोल अकुंश दळवी, अमोल एकनाथ दळवी, किरण शिवाजी दळवी यांना नगर तालुक्यात सोनेवाडीतून रात्री अटक झाली. चार जणांना सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी बातमी : शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांच्यावर हल्ला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement