एक्स्प्लोर

‘आरक्षण मागताय तर बाबासाहेबांचं नाव का घेत नाहीत’? पडळकरांचा नाव न घेता जरांगेना सवाल!

‘आरक्षण हवंय पण बाबासाहेब सन्मान द्यायला तयार नाही’, असे म्हणत पडळकरांनी मनोज जरंगेंवर टीका केली आहे. 

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा समाजाकडून आंदोलने करण्यात येत आहेत. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. तर दुसरीकडे धनगर समाजाने देखील आंदोलन सुरू केले आहे. ‘आरक्षण मागताय तर बाबासाहेबांचं नाव का घेत नाहीत? असे म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar)  नाव न घेता थेट मनोज जरांगेना (Manoj Jarange) सवाल केला आहे. ‘आरक्षण हवंय पण बाबासाहेब सन्मान द्यायला तयार नाही’, असे म्हणत पडळकरांनी मनोज जरंगेंवर टीका केली आहे. 

पडळकर म्हणाले,  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेत आरक्षण दिले. त्यामुळेच आमचे एकच साहेब बाबासाहेब आहे. पण काही पुरोगामी म्हणून मिरवणाऱ्या नेत्यांनी निर्माण केलेले जातीयवादी माणूस आरक्षण मागतो पण  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सन्मान द्यायला व त्यांचे नाव घ्यायला तयार नाही. आम्ही आज बाबासाहेबांमुळे आहोत हे आम्ही मान्य करतो.आम्ही आरक्षणासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहे. 

70 वर्षे आमच्यावर अन्याय झाला: पडळकर 

धनगर समजाला संविधानाने आरक्षण दिले आहे.  70 वर्षे आमच्यावर अन्याय झाला आहे. 70 वर्षात आमचा समाज खूप पुढे गेला असता परंतु आमचा समाज या सगळ्या गोष्टींना मुकला आहे. 70 वर्षात जे झाले ते आता आम्ही होऊ देणार नाही. आम्ही सगळे एकत्रित झालोय. संघटित होऊन धनगरांच्या हातात एसटी समाजाटचा दाखला द्या याला दुसरा कोणतच पर्याय नाही. यासाठी आपण रस्त्यावरची लढाई देखीस ताकतीने लढू असे, पडळकर यावेळी म्हणाले. 

पडळकरांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

गोपीचंद पडळकरांनी यसंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. पडळकर आपल्या पत्रात म्हणाले,  गेल्या  वर्षांपासून धनगर समाज आपल्या संविधानिक अधिकारापासून वंचित आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश केला. मात्र, महाआघाडी सरकारने  हेतुपूर्वक ‘धनगड’ आणि ‘धनगर’ असा गोंधळ निर्माण केला. राज्यात आपले महायुतीचे सरकार आहे. या सरकारकडून धनगर आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे. मात्र, आरक्षण अंमलबजावणीसाठी ५० दिवसांची मुदत उलटून गेली आहे.कुठेही हिंसाचार होत असेल तर त्याचा मी निषेध करतो. आंदोलने शांततेच्या मार्गानेच व्हावी ही धनगर समाजाची भूमिका आहे. परंतु धनगर समाजाच्या प्रश्नांबाबत जर काही अधिकारी हेतुपुरस्पर असंवेदनशीलपणे वागत आहेत. यातून धनगर समाजाला चिथावून पुन्हा राज्य अस्थिर करण्याचे काही अधिकाऱ्यांचा प्रयत्न असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. तसेच आंदोलनातल्या 36 समाजबांधवांवरील दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याचे आपण तात्काळ आदेश द्यावे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Rahul Gandhi | प्रचाराचा शेवटचा दिवस, एक है तो मोदी-अदानी सेफ है, राहुल गांधींची टीकाAnil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेरBIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget