रत्नागिरी जिल्ह्याकरता दिलासादायक बातमी; उदय सामंत यांचा महत्त्वाचा निर्णय
कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 77 वर पोहचला आहे. उच्च शिक्षणंत्री उदय सामंत यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला असून जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाची स्वॅब चाचणी होणार आहे.
![रत्नागिरी जिल्ह्याकरता दिलासादायक बातमी; उदय सामंत यांचा महत्त्वाचा निर्णय Good news for Ratnagiri district about coronavirus रत्नागिरी जिल्ह्याकरता दिलासादायक बातमी; उदय सामंत यांचा महत्त्वाचा निर्णय](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/16012209/Uday-Samant-New.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
रत्नागिरी : साधारण 15 दिवसांपूर्वी कोरोनामुक्तिकडे वाटचाल करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा आता 77 वर पोहोचला आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरांमधून चाकरमानी येत आहेत. त्यानंतर कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत देखील वाढ होताना दिसत आहेत. मागील 12 ते 13 दिवसांचा विचार करता जिल्ह्यात तब्बल 71 रूग्ण वाढले. या साऱ्यांचा प्रवास तपासल्यानंतर सारे जण मुंबईहून आलेले आहेत. पण, प्रशासन त्यांना वेळीच क्वॉरंटाईन करत ठेवत असल्याने त्याचा प्रसार होण्याची शक्यता नाही.
दिवसेंदिवस कोरोनाबाधित वाढत असताना रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातून आतापर्यंत 8 जणांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील 4, चिपळूणमधील 1 तर दापोलीतील 3 जणांचा समावेश आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ही 61वर पोहोचली आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आतापर्यंत 8 जणांना घरी सोडण्यात आल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय लॉकडाऊनचा कालावधी हा वाढवला जात आहे. त्यानंतर आता मुंबई, पुणे किंवा इतर भागातून मुळचे कोकणातील असलेले नागरिक आपल्या कोकणातील मुळगावी परतत आहेत. ही संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे या साऱ्यांचे स्वॅब घेणे आणि त्यांची तपासणी करणे ही बाब सध्या प्रशासनावर ताण आणणारी आहे. अशावेळी मिरज येथील लॅबने दररोज मोठ्या प्रमाणावर स्वॅबची तपासणी करण्यास नकार दिल्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला आहे. याबाबत आता रत्नागिरीचे आमदार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता रत्नागिरी, सिंधुदुर्गाकरता कोरोना तपासणीसाठी गोवा राज्याच्या धर्तीवर ‘ट्रू नेट’ मशिन खरेदी केली जाणार आहेत.
शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्याचं स्वातंत्र्य; केंद्र सरकारकडून कृषीक्षेत्रासाठी 11 मोठ्या घोषणा
दोन्ही जिल्ह्यांकरता एक-एक मशीनची खरेदी होणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मशीनद्वारे निगेटीव्ह रिपोर्ट प्राप्त होतील. एका तासाला 4 स्वॅब तपासले जातील. शिवाय, जे स्वॅब निगेटीव्ह येणार ते स्वॅब मिरजला पाठवले जातील. त्यानंतर जर का रिपोर्ट पॉझिटीव्ह आले तर त्यांना रूग्णालयात उपचाराकरता दाखल केले जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. यामुळे कोरोनावर लवकर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. शिवाय, चाकरमान्यांच्या तपासणीचा प्रश्न देखील मार्गी लागेल अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
चाकरमान्यांना होतोय विरोध कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांना काही गावांमध्ये विरोध केला जात आहे. तर, काही गाव नियमावली तयार करत त्यांना गावी घेण्याकरता तयार देखील आहेत. प्रशासनाकडून देखील या साऱ्या गोष्टीवर लक्ष ठेवले जात असून गावातील वाडी पातळीवर तरूणांचे कृती दल तयार करणार असल्याची माहिती यापूर्वीच जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.
Tourism | कोरोनानंतरची आव्हाने | Veena Patil, Director, Veena World | माझा गेस्ट | ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)