(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gondia News : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पोलिसांची विशेष भेट; चोरीला गेलेले मोबाइल नागरिकांना केले सुपूर्द
Gondia News : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सर्वात महत्वाचा सण म्हणजे अक्षय्य तृतीया. याच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर गोंदिया पोलिसांनी जिल्ह्यातील काही नागरिकांना एक सुखद धक्का दिला आहे.
गोंदिया : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सर्वात महत्वाचा सण म्हणजे अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya). याच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर गोंदिया (Gondia News) पोलिसांनी जिल्ह्यातील काही नागरिकांना एक सुखद धक्का दिला आहे. पोलीस विभागाद्वारे (Gondia Police) जिल्ह्यातील 50 मोबाईल धारकांचे मोबाईल शोधून त्यांच्या मुळ मालकांना हे मोबाइल स्वाधीन करण्यात आले आहेत. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने मोबाईल धारकांनी आनंद व्यक्त केला आहे. साडेतीन मुहूर्तंपैकी एक असा अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तांवर गोंदिया पोलीस विभागाद्वारे चोरी गेलेले तसेच हरवलेले मोबाईल त्यांच्या मालकांना स्वाधीन केल्याने पोलीस प्रशासनाचे या नागरिकांनी आभार मानत आनंद व्यक्त केला. पोलिसांवर विश्वास ठेऊन मोबाईल संबंधी तक्रार नोंदवावी, असे आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांनी केले आहे.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पोलिसांची विशेष भेट
एकदा मोबाइल हरवला अथवा चोरी गेला तर परत तो मिळेलच याची शाश्वती जवळ जवळ नाहीच्या बरोबर असते. असे असले तरी नागरिक पोलिसांवर पूर्ण विश्वासह दर्शवत या संबंधित तक्रार नोंदवत असतात. अशाच तक्रारींवर पोलीस कसोशीचे प्रयत्न करून सर्वसामन्याचे मोबाइल मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशाच परत्नातून हाती लागलेले 50 मोबाइल पोलिसांनी नागरिकांना परत केले आहे. विशेष म्हणजे आज अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तांवर ही अनोखी भेट नागरिकांना मिळाल्याने नागरिकांना सुखद धक्का बसला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील बस स्थानक,आठवडी बाजार, रुग्णालय, रेल्वे स्थानकातून मोबाईल चोरीच्या घटना वाढत असल्याची तक्रार नागरिकांना कडून पोलिसांकडे आल्याचे निदर्शनात आले होते. असे असताना पोलिसांनी यावर आळा बसावा यासाठी विशेष मोहीम राबवली होती. त्याअंतर्गत अनेक गुन्हेगारांना अटक करून त्यांच्या जवळील हे मोबाइल जप्त केले आहे. तसेच यात सायबर सेलची मदत घेत चोरीला गेलेले काही मोबाईल पोलिसांनी शोधून काढले आहे. आज अक्षय तृतीयाचे अवचित्त साधून हे सर्व मोबाइल परत नागरिकांना सुपूर्द केले आहेत.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
यात सॅमसंग, विवो, वन प्लस, ओपो, एप्पल या सारख्या 50 महागाड्या मोबाईलवर देखील चोरट्यांनी डल्ला मारला असता पोलिसांनी हे सर्व मोबाईल शोधून काढत नागरिकांना परत केले आहे . तर यापुढे एखाद्या व्यक्तीचा मोबाईल हरविला असल्यास किंवा चोरीला गेल्यास त्याची रितसर तक्रार पोलिसांकडे करावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांनी केले.
इतर महत्वाच्या बातम्या