एक्स्प्लोर

Gondia News : जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य असतानाच पाण्याची टाकी कोसळली; टाकीच्या गुणवत्तेवरुन चौकशीची मागणी   

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी या गावांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत 2 पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या होत्या. मात्र त्यातील एक टाकी निकृष्ट दर्जाची असल्याने ती कोसळली आहे.

Gondia News गोंदिया : राज्यात एकीकडे पाणीटंचाईचे भीषण सावट (Water Crisis) असून अनेक गावातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी कित्येक मैलांची पायपीट करावी लागत आहे. राज्यात असे भयावह चित्र असताना दुसरीकडे मात्र नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करणारी जलजीवन मिशन योजनेचे साहित्य तकलादू पद्धतीने लावण्यात येत आहेत. याचेच एक जिवंत उदाहरण हे गोंदिया (Gondia News) जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी या गावात बघायला मिळाले आहे.

सुमारे 9 लक्ष रुपये निधी खर्च करून गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी या गावांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत 2 पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या होत्या. मात्र, या पाण्याच्या टाक्या निकृष्ट दर्जाच्या आहेत, अशी ओरड गावकऱ्यांनी आधीच केली होती. अशातच आता त्यातील 1 पाण्याची टाकी अचानक कोसळून पडल्याने या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्हे निर्माण होत आहेत. तर ऐन उन्हाळ्यात पाण्याची टाकी तुटून पडल्याने नागरिकांवर जलसंकट देखील ओढावले आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

टाकीच्या गुणवत्तेवरुन चौकशीची मागणी  

विदर्भात अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता उष्णतेच्या पातळीने नवे उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यांतील उष्णतेचा पाऱ्याने चाळीशी ओलांडली असून सध्या एकट्या अकोला शहरात आज 45.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानची नोंद करण्यात आली आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील असेच काहीसे चित्र आहे. मात्र या उष्णतेमुळे अनेक गावातील नैसर्गिक स्त्रोतांनी तळ गाठल्याने जलसंकटाचे मोठे संकट ओढवले आहे.

अशातच आता गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी या गावाला पाणी पुरवठा करणारी एक टाकी अचानक फुटून खाली कोसळल्याने गावातील जलसंकट अधिक गडद झाले आहे. परिणामी, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता या प्रकरणी प्रशासन नेमकं काय कारवाई करतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

95 लक्ष खर्च करून केलेली जल जीवन मिशन योजना ठरली फोल

तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील पालेवाडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महीलांची शेत शिवारातील भटकंती शासनाच्या विविध पाणी योजनांचा समाचार घेण्यासारखी आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर जलजीवन मिशन मोहीम राबविण्यात येत आहे. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पालेवाडा या गावात घरोघरी नळ कनेक्शन लावण्यात आले. मात्र जिल्हा परिषदेने ज्या ठिकाणी पाण्याच्या मुख्य स्त्रोतासाठी विहीर खोदली ती जागा चुकीची निवडल्याने जानेवारी महिन्यातच तेथील पाणी आटले आहे. यासह गावातील बोरवेल देखील कोरड्या पडल्याने आता येथील महिलांना पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. 

परिणामी, गावातील शेत-शिवारातून महिलांना पाणी आणावे लागत आहे. तर चुकीच्या नियोजनामुळे 95 लक्ष खर्च करून देखील गावकऱ्यांना पाणी मिळत नसेल तर शासनाच्या योजना खरचं नागरिकांसाठी राबविण्यात येतात का ? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर पालेवाडा गावापासून अवघ्या 5 किमी अंतरावर असलेल्या कलपाथरी मध्यम प्रकल्पावर पाण्याची योजना कार्यान्वीत करून पालेवाडावासियांची तहान भागवावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'

व्हिडीओ

Sanjay Raut On BJP BMC Mayor : मराठी मतांच्या दबावामुळे भाजपने मराठी महापौर केला
Amol Mitkari On Ajit Pawar: पायलटला संमोहित करण्यात आले होते का? अजितदादांच्या अपघातावरुन मिटकरींच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
Vijay Sethupathi Majha Katta : 96 चा हिरो, साऊथचा सुपरस्टार, विजय सेतूपतीची माझा कट्टावर मोठी घोषणा
Burkha in Local Train : मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर Special Report
ZP Election Election : जिंकली लोकशाही, आजी नववधूच्या बोटाला शाई Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Laxman Hake : अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन, त्यांनी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नये; त्यांना फक्त भुंकण्यासाठी....; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन, त्यांनी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नये; त्यांना फक्त भुंकण्यासाठी....; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
आम्ही 'बॅक सीट ड्रायव्हिंग' करत नाही. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
आम्ही 'बॅक सीट ड्रायव्हिंग' करत नाही. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
Embed widget