TET परीक्षेमध्ये 'मुन्नाभाई स्टाईल'ने कॉपी, भावी शिक्षिकेने ब्लूटूथच्या सहाय्याने पेपर सोडवला
संत तुकाराम शाळेमध्ये चालू असताना रूम नंबर 5 मध्ये एका मुलीने ब्लूटुथ लावून पेपर सोडवण्याची तक्रार सोबतच मागे असलेल्या विद्यार्थिनीने केली. त्यामुळे बराच गोंधळ उडाला.
गोंदिया : परीक्षा व्यवस्था जशा अत्याधुनिक होत चालल्या आहेत तशा त्यामध्ये कॉपी करण्याच्या पद्धतीमध्येही सातत्याने बदल होताना दिसत आहे. गोंदियामध्ये टीईटीच्या परीक्षेमध्ये एका भावी शिक्षिकेने चक्क मुन्नाभाई स्टाईलने कॉपी केली. या भावी शिक्षिकेने ब्लूटूथच्या सहाय्याने पेपर सोडवला. पण हा प्रकार पर्यवेक्षकांच्या लक्षात येताच तिच्यावर कारवाई करण्यात आली.
आज राज्यात सर्वत्र शिक्षक पात्र परीक्षा सुरू असून गोंदिया जिल्हात अनेक ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आले होते. गोंदियातील संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा येथील परीक्षा केंद्रावर खोली क्रमांक 5 मध्ये एका भावी शिक्षीकेने चक्क ब्लूटूथच्या माध्यमातून पेपर सोडविताना बाजूच्या परीक्षार्थीने पकडले. तिने या प्रकरणाचा भांडाफोड केला.
आज TET चा पेपर होता. संत तुकाराम शाळेमध्ये चालू असताना रूम नंबर 5 मध्ये एका मुलीने ब्लूटुथ लावून पेपर सोडवण्याची तक्रार सोबतच मागे असलेल्या विद्यार्थिनीने केली. त्यामुळे बराच गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. प्रत्येक परीक्षेवेळी इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्याची परवानगी नसते. मग या मुलीजवळ ब्लूटूथ कसा आला? सेंटर वर चेकिंग झाली नाही का? चेकिंग झाली तर ब्लूटूथ का दिसला नाही? असे सवाल अनेकांनी उपस्थित केले.
टीईटी परीक्षा देणारे म्हणजे भावी शिक्षक, ज्यांना उद्याचा देश घडवायचा आहे. अशातच जे भावी पीढीला दिशा देणारे आहेत त्यांनीच जर असे प्रकार केले तर देशाचे भविष्य कसं घडणार असा प्रश्न चिन्हदेखील उपस्थित होतो. मुलीच्या तक्रारीवरून सर्वांचा जबाब नोंदवण्यात आला. आता संबंधित मुलीवर काय कारवाई केली जाते याकडे संपूर्ण विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या :