एक्स्प्लोर
Advertisement
सोन्याच्या दरात घसरण, प्रतितोळा तीन हजारानं स्वस्त
जळगाव: 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर गेले दिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. 30 हजार रुपये प्रतितोळा मिळणारं सोनं प्रतितोळा थेट 34 हजारांपर्यंत पोहोचलं होतं. पण दोन दिवसाच्या धामधुमीनंतर आता सोन्याचे दर पुन्हा एकदा उतरले आहेत.
गेले दोन दिवस सोन्याचा व्यापार बराच तेजीत होता. मात्र, आता दोन दिवसानंतर जळगावमधील सराफ व्यापर पूर्णपणे थंडावला आहे. दोन दिवसापूर्वी जळगावमध्ये सोन्याचा भाव ३३ हजारापर्यंत गेला होता. मात्र आज सोन्याचा भाव घसरुन ३० हजारापर्यंत आला आहे.
दरम्यान, 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द केल्यानं लोकांमधील घबराटीमुळे सोन्याचे दर वाढले होते. असं मत जाणकारांनी व्यक्त केलं होतं. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये आयकर विभागनं ज्वेलर्सवर टाकलेल्या धाडसत्रानंतर सोन्याच्या व्यापाऱ्यांनी धास्ती घेतली असल्याचंही बोललं जात आहे.
संबंधित बातम्या:
सोन्याचा दर वधारला, प्रतितोळा चार हजारांनी वाढ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement