एक्स्प्लोर

Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; 10 लाख 61 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी-गडहिंग्लज मार्गावर लाकूडवाडी घाटात चारचाकी वाहनातून लपवून नेत असलेला 4 लाख 61 हजारांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा तसेच वाहनासह 10 लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी-गडहिंग्लज मार्गावर लाकूडवाडी घाटात चारचाकी वाहनातून लपवून नेत असलेला 4 लाख 61 हजारांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा तसेच वाहनासह 10 लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने केली.  भरारी पथकाला संशयित सागर ठाकूर (रा. साठेली, सिंधुदुर्ग) व प्रदीप गावडे (कैरी, सिंधुदुर्ग) हे नेसरी गडहिंग्लज मार्गावरून पुढे जाणार असल्याची माहिती मिळाली होती. संशयितांकडे असलेले चारचाकी वाहन पथकाने थांबण्याचा इशारा करून थांबले नाही. त्यांनी पहाटेचा अंधार असल्याने वाहन सोडून पलायन केले.

भरारी पथकाने पाहणी केली असता या वाहनात 180 व 750 मिलीमधील विविध ब्रँड्सचे 74 बॉक्स सापडले. बाजारभावाने त्यांची किंमत 4 लाख 61 हजार व चारचाकी वाहनाची किंमत 6 लाख असा 10 लाख ६१1 हजारांचा मुद्देमाल भरारी पथकाने जप्त केला. 

कोल्हापुरात तब्बल साडे तीन कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त

कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना जेरबंद करत तब्बल 3.41 कोटी रुपये किमतींची 3 किलो 413 ग्रॅम व्हेल माशाची उलटी (Ambergris also known as Whale Vomit) जप्त केली. प्रदीप शाम भालेराव (वय 36, रा. मुंबई, चेंबूर), शकील मोहन शेख (वय 34, रा. येरवडा, पुणे) आणि अमीर हाजू पठाण (वय 32, रा. विश्रांतवाडी, पुणे) या तिघांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. संशंयितांची रवानगी गांधीनगर पोलिसांकडे करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अत्तर, सौंदर्य उत्पादने आणि औषधे बनवण्यासाठी अॅम्बरग्रीस म्हणजेच व्हेल माशाच्या उलटीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, शेष मोरे, श्रीकांत मोहीते, वैभव पाटील, विजय गुरखे, सचिन देसाई, हिंदुराव केसरे, अनिल पास्ते, दिपक घोरपडे, सोमराज पाटील, उत्तम सडोलीकर, रफीक आवळकर, वनअधिकारी रमेश कांबळे, वनपाल विजय पाटील यांनी सहभाग घेतला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: शरद पवारांचा फोन आला अन्...; पुणे विधान परिषदेसाठी या नावावर शिक्कामोर्तब! आज भरणार उमेदवारी अर्ज
शरद पवारांचा फोन आला अन्...; पुणे विधान परिषदेसाठी या नावावर शिक्कामोर्तब! आज भरणार उमेदवारी अर्ज
Maharashtra News Live Updates: विषारी दारू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे सुनेत्रा पवार यांचे आदेश
Maharashtra News Live Updates: विषारी दारू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे सुनेत्रा पवार यांचे आदेश
Gadchiroli Crime : पैशांच्या वादातून अल्पवयीन मित्रांमध्ये राडा, एकाने संतापाचं टोक गाठलं, सोबतच मित्रालाच संपवलं; गडचिरोली हादरलं!
पैशांच्या वादातून अल्पवयीन मित्रांमध्ये राडा, एकाने संतापाचं टोक गाठलं, सोबतच मित्रालाच संपवलं; गडचिरोली हादरलं!
Mangalwedha Reel Star Rohini Paradhye Ends Life: दुसरं लग्न, आंतरजातीय प्रेमविवाह अन् हॉटेल ग्रामपंचायतच्या दोन नव्या शाखा; इन्स्टाग्रामवरील रिल स्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्याचा दोर का कापला?
दुसरं लग्न, आंतरजातीय प्रेमविवाह अन् हॉटेल ग्रामपंचायतच्या दोन नव्या शाखा; इन्स्टाग्रामवरील रिल स्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्याचा दोर का कापला?

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mangalwedha Reel Star Rohini Paradhye Ends Life: दुसरं लग्न, आंतरजातीय प्रेमविवाह अन् हॉटेल ग्रामपंचायतच्या दोन नव्या शाखा; इन्स्टाग्रामवरील रिल स्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्याचा दोर का कापला?
दुसरं लग्न, आंतरजातीय प्रेमविवाह अन् हॉटेल ग्रामपंचायतच्या दोन नव्या शाखा; इन्स्टाग्रामवरील रिल स्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्याचा दोर का कापला?
Bank Holidays : जून महिन्यात बँका 11 दिवस बंद राहणार, बँकेतील कामाचं नियोजन करण्यापूर्वी संपूर्ण यादी चेक करा   
जून महिन्यात बँकांना किती दिवस सुट्टी, बँकांचं कामकाज कधी बंद असणार? जाणून घ्या
Pimpri Crime liquor poisoning: पुण्यातील विषारी दारुकांड नेमकं उघडकीस कसं आलं, आतापर्यंत किती मृत्यू? A टू Z माहिती
पुण्यातील विषारी दारुकांड नेमकं उघडकीस कसं आलं, आतापर्यंत किती मृत्यू? A टू Z माहिती
RBI : रिझर्व्ह बँक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, चलनातील नव्या नोटा खास पद्धतीने तयार होणार, ना पाण्यात भिजण्याचं टेन्शन ना फाटण्याची भीती
आरबीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, चलनातील नव्या नोटा खास पद्धतीने तयार होणार, ना पाण्यात भिजण्याचं टेन्शन ना फाटण्याची भीती
Vaibhav Sooryavanshi : IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची थेट पाकिस्तानच्या आफ्रिदीशी तुलना; दिग्गज क्रिकेटपटूने नेमकं काय काय म्हणाला?
IPL गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची थेट पाकिस्तानच्या आफ्रिदीशी तुलना; दिग्गज क्रिकेटपटूने नेमकं काय काय म्हणाला?
Hardik Pandya Mumbai Indians : मुंबई इंडियन्समध्ये संघात मोठं बंड? रोहित शर्मानंतर हार्दिकचाही गेम ओव्हर... मॅनेजमेंट तडकाफडकी घेणार निर्णय
मुंबई इंडियन्समध्ये संघात मोठं बंड? रोहित शर्मानंतर हार्दिकचाही गेम ओव्हर... मॅनेजमेंट तडकाफडकी घेणार निर्णय
Vidhan Parishad Election 2026: महायुतीचं विधानपरिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात, फॉर्म्युला ठरला, कोणती जागा कोणाच्या वाट्याला?
महायुतीचं विधानपरिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात, फॉर्म्युला ठरला, कोणती जागा कोणाच्या वाट्याला?
Reel Star Mahesh Mote Toll Plaza Row: 'मी सामान्य माणूस नाही, रिल स्टार आहे... रिल स्टार'; टोलनाक्यावर महेश मोटेचा धिंगाणा, फुकटात कार सोडवण्यासाठी अरेरावी
'मी सामान्य माणूस नाही, रिल स्टार आहे... रिल स्टार'; टोलनाक्यावर महेश मोटेचा धिंगाणा, फुकटात कार सोडवण्यासाठी अरेरावी
Embed widget