Sharad Pawar Gautam Adani: 'सिल्वर ओक'वर पवार-अदानींमध्ये दोन तास बैठक; कोणत्या मुद्यांवर झाली चर्चा?
Sharad Pawar Gautam Adani: गौतम अदानी यांनी आज शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे.
![Sharad Pawar Gautam Adani: 'सिल्वर ओक'वर पवार-अदानींमध्ये दोन तास बैठक; कोणत्या मुद्यांवर झाली चर्चा? Gautam Adani meets Sharad Pawar at his Silver Oak Mumbai residence Maharashtra Sharad Pawar Gautam Adani: 'सिल्वर ओक'वर पवार-अदानींमध्ये दोन तास बैठक; कोणत्या मुद्यांवर झाली चर्चा?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/20/41b22edb301feba726c381835a25e7141681982769851290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sharad Pawar Gautam Adani: मागील काही महिन्यांपासून विविध कारणांनी चर्चेत असलेले उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सिल्वर ओक (Silver Oak) या निवासस्थानी बंद दाराआड चर्चा केली. मागील काही दिवसात राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणांवर घडल्या आहेत. विविध चर्चांना उधाण आले होते. त्या पार्श्वभूमीवर आज अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात चांगले संबंध आहेत. शरद पवार यांनी याआधीदेखील अदानी यांच्या उद्योगशीलतेचे कौतुक केले होते. उद्योगपती गौतम अदानी यांनी आज शरद पवारांचं निवासस्थान सिल्वर ओकवर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली.. चर्चेचा विषय नेमका काय होता, याबाबत अजून माहिती मिळू शकलेली नाही. अदानी आणि पवारांचे जुने संबंध आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वीच हिंडेनबर्ग प्रकरणी पवारांनी अन्य विरोधकांपेक्षा वेगळी भूमिका घेतली होती. सुप्रीम कोर्टानं चौकशी समिती स्थापन केल्यावर जेपीसीची गरज नाही, असा पवार म्हणाले होते. मात्र, पवारांच्या या वक्तव्यावर काँग्रेस आणि इतर पक्षांनी जेपीसी चौकशीवर ठाम असल्याचे म्हटले होते. त्यानंतर पवार यांनी नरमाईची भूमिका घेतली.
याआधीदेखील महाविकास आघाडीचे सरकार असताना गौतम अदानी यांनी बारामतीला भेट दिली होती. या भेटीत बारामतीत सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे उद्घाटन पार पडले. या उद्घाटनासाठी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिले होते. अदानी यांच्या या भेटीनंतर काही दिवसात महाविकास आघाडीचे कोसळले होते.
अदानींविरोधात काँग्रेस आक्रमक
जानेवारी महिन्यात अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गने अदानी समूहातील कंपन्यांमध्ये आर्थिक घोटाळा असल्याचे आरोप केले होते. शेअर्सची किंमत कृत्रिम पद्धतीने वाढवणे, आर्थिक अनियमितता आदी मुद्यांवर हिंडनेबर्गने प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर काँग्रेसने अदानी समूहाला केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या झुकत्या मापावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. संसदेच्या अधिवेशनातही काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी या प्रकरणी संयुक्त संसदीय चौकशी समितीची मागणी केली होती. तर, भाजपने ही मागणी फेटाळून लावली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)