By :
एबीपी माझा वेब टीम | Updated at : 01 Sep 2020 04:14 PM (IST)
16:14 PM (IST) • 01 Sep 2020
गणेश विसर्जन करण्यासाठी गेल्या लष्करी जवानांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील वखारी गावातील घटना घडली.
विहिरीत तोल जाऊन पडल्याने जवानांचा मृत्यू झाला आहे. प्रशांत गुंजाळ असे लष्करी जवानांचे नाव असून अरुणाचल प्रदेशात लष्करी सेवेत होते.
दोन महिन्याची सुट्टी घेऊन घरी आले होते.
16:11 PM (IST) • 01 Sep 2020
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश विसर्जन कृत्रिम हौदात करण्यात आले. विसर्जनासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडपाच्या बाहेर हौद तयार करण्यात आला होता. या प्रसंगी मोठ्या संख्येने गणेशभक्त जमा झाले होते. या वेळी भंडारा उधळत शंखनाद करत गणेशाची विसर्जन मिरवणूकही काढण्यात आली . उपस्थित गणेश भक्तांनी गणेशाचा नामघोष केला. त्यानंतर शेवटी बाप्पाची आरती झाल्यानंतर त्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.
23:03 PM (IST) • 31 Aug 2020
हिंगोली : हिंगोली शहरात दरवर्षी अनंत चतुर्थी निमित्त मोठ्या जल्लोषात निघणारी कावड यात्रा कोरोणाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी रद्द करण्यात आली आहे. दरवर्षी या कावड यात्रेला शहरातील हजारो भाविक उपस्थित असतात. सोबतच शहरातील कावड यात्रा देखील असतात. मात्र यावर्षी चार ते पाच मोजक्याच लोकात कावड यात्रा संपन्न झाली असून कयाधू नदी तिल पाण्याने चिंतामणी गणपती ला जल अभिषेक करण्यात आला.
22:59 PM (IST) • 31 Aug 2020
जळगाव : यंदा कोरोनाच सावट असल्याने गणेश विसर्जन सोहळ्यावर मोठ्या प्रमाणावर मर्यादा आहेत,जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता गणेश विसर्जन काळात गर्दी करून त्यात आणखी भर पडू नये या साठी गर्दी न करता घरच्या घरीच आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन करावं असं आवाहन भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी गणेश भक्तांना यावेळी केलं आहे,त्याला सर्व थरातून चांगला प्रतिसाद देखील मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
22:58 PM (IST) • 31 Aug 2020
बेळगाव : संयुक्त महाराष्ट्र चौकातील मानाच्या गणपतीची आमदार अनिल बेनके आणि मान्यवरांनी आरती केली. त्यानंतर गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला.प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार मोजकेच कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.दरवर्षी विसर्जन मिरवणुकीच्यावेळी पाहायला मिळणारी गर्दी आणि भक्तांचा उत्साह,आतषबाजी,वाद्यांचा आणि डॉल्बीच्या दणदणाट कोरोनामुळे यावर्षी पाहायला मिळाला नाही.सायंकाळी सहाच्या अगोदर सार्वजनिक मंडळांनी विसर्जन करावे अशी सूचना पोलीस खात्याने केल्यामुळे सकाळी दहापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन करण्यास प्रारंभ केला आहे.