कोल्हापुरात विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांचे गांधीगिरी पद्धतीने स्वागत!
कोल्हापुरात विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांचे गांधीगिरी पद्धतीने स्वागत करण्यात येत आहे. महापालिका आणि विविध संघटनेच्या सहकार्याने हा अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे.
कोल्हापूर : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत नो मास्क नो एन्ट्री हा उपक्रम कोल्हापूर शहरात सुरु आहे. मास्क नसलेल्या नागरीकांना महानगरपालिकेच्यावतीने आणि चेंबर ऑफ कॉमर्स तसेच विविध व्यापारी असोशिएशनच्या सहकार्याने मोफत मास्क आणि गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. शिवाय यापुढे कायम मास्क लावण्याचा सल्लाही दिला.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत नो मास्क नो एन्ट्री ही मोहिम गतीमान केली आहे. मास्क वापरा, सामाजिक अंतर ठेवा यासाठी सर्वदूर जनजागृती मोठ्या प्रमाणात होत असतानाही काही नागरीकांनी कोरोना संसर्गाचे गांभिर्य घेतलेले दिसत नाही, उलट कित्तेक नागरिक विनामास्क रस्त्यावरुन फिरताना आढळतात, या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि चेंबर ऑफ कॉमर्स, महाव्दाररोड व्यापारी असोशिएशन, कापड व्यापारी संघ अशा शहरातील विविध व्यापारी असोसिएशन आणि संघटनांच्या सहकार्याने विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर आज दंडात्मक कारवाई न करता त्यांची गांधीगिरी पद्धतीने मास्क आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्याचा अभिनव उपक्रम राबविला.
दिल्ली बनतेय कोरोनाची राजधानी, मुंबईतला वेग मंदावला तर दिल्लीत थैमान सुरु!
या गांधीगिरीमुळे शहरात सर्वजण या पुढील काळात मास्क वापरुन महापालिका प्रशासनास सहकार्य करतील अशी अपेक्षा अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई यांनी यावेळी व्यक्त केली. कोरोना प्रतिबंधासाठी महापालिकेने जारी केलेल्या प्रतिबंधक उपाययोजनांचे सर्व नागरीकांनी तंतोतंत पालन करावे. नागरीकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, वारंवार हात धुणे अशा प्राथमिक पण महत्वाच्या उपाययोजना कराव्यात. याबरोबर मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही वस्तूहीनाही ही मोहिम यशस्वी करण्यात नागरिकांबरोबरच व्यापारी बांधवांनी सक्रीय व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
Kolhapur | स्वच्छतागृहाचं पाणी पाणीपुरीच्या ठेल्यावर वापरलं, रंकाळा तलाव परिसरातील घटना व्हायरल