एक्स्प्लोर
गडचिरोलीतील कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येला वेगळे वळण, विवाह केलेल्या जोडप्याचा देखील आत्महत्येचा प्रयत्न
मुलीने आंतरजातीय विवाह केला. हा अपमान समजून आईवडील आणि भावाने विहिरीत जीव दिला. तिघांच्या मृत्यूची बातमी कळताच नवविवाहित जोडप्याने नदीत उडी टाकत आत्महत्येचा प्रयत्न केला. मागावर असलेल्या पोलिसांनी जीवाची पर्वा न करता जोडप्याला वाचविले.
गडचिरोली : गडचिरोलीत कुटुंबातल्या मुलीनं आंतरजातील विवाह केल्यामुळे कुटुंबानं आयुष्य संपवल्याची घटनेला वेगळ वळण मिळालं आहे. वरगंटीवार कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केली. समाजाच्या भीतीनं मुलीचे आई-वडील आणि भावानं विहीरीत उडी घेत आयुष्य संपवलं. घरातल्या तिघांनीही आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या मृत्यूला जबाबदार धरत आंतरजातीय विवाह केलेल्या नवविवाहीत जोडप्यानंही आत्महत्येचा प्रयत्न केला.
आत्महत्येपूर्वी जोडप्यानं सोशल मीडियावर घरच्यांच्या मृत्यूमुळे व्यथित होऊन आत्महत्या करत असल्याची व्हीडिओ क्लीप टाकली. पोलिसांना व्हीडिओ क्लीप बाबत माहिती मिळताच पोलिसांनी नवविवाहित जोडप्याचं लोकेशन मिळवलं. आणि पोलीस पथकाच्या डोळ्यासमोर या जोडप्यानं चामोर्शी मार्गावरील पोर नदीत उडी मारली. पोलीस पथकाने क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी घेत दोघांना वाचविले. या दोघांनीही विषप्राशन केल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या दोघेही जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
Gadchiroli Family Suicide | मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने गडचिरोलीतील एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या
गडचिरोली शहरातील विवेकानंदनगर भागात नागरिकांची सोमवारची (10 फेब्रुवारी) सकाळ धक्क्याने झाली. रविंद्र वरगंटीवार यांच्या घरातील आईवडील आणि मुलगा यांनी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. घटनेने सारे शहर सुन्न झाले. या घरातील लाडक्या लेकीने कुटुंबाचे मत झुगारून 24 तास आधी आंतरजातीय विवाह केला. अस्वस्थ झालेल्या तिघांनी ' समाज काय म्हणेल?' या प्रश्नाचे काहूर माजल्याने आत्महत्या केली. जिल्हा आणि राज्यभर खळबळ उडाली.
रविंद्र, वैशाली, आणि साई यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात रवाना झाले. पोलीस या प्रकरणाचे धागेदोरे जुळवत असताना त्यांना नववविवाहित जोडप्यापैकी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाली. पाठोपाठ जोडप्याने सोशल मीडियावर वायरल केलेल्या ऑडिओ क्लिपची माहिती मिळाली. यामध्ये त्यांनी तिघांच्या मृत्यूने व्यथित होत आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. जोडप्याच्या मागावर असलेल्या पोलिसानी जीव धोक्यात घालून दोघांना वाचविले.
संबंधित बातम्या :
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेप
सुमीत वाघमारे हत्या : पत्नी भाग्यश्री आणि कुटुंबाला जामीनावर असलेल्या आरोपींकडून धमकी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
विश्व
बीड
Advertisement