एक्स्प्लोर

सुमीत वाघमारे हत्या : पत्नी भाग्यश्री आणि कुटुंबाला जामीनावर असलेल्या आरोपींकडून धमकी

बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावानेच तिच्या पतीची हत्या केल्याची घटना बीडमध्ये सुमारे दीड वर्षांपूर्वी घडली होती. या प्रकरणी जामीनावर बाहेर असलेल्या आरोपींनी सुमीतची पत्नी भाग्यश्री आणि वाघमारे कुटुंबीयांना केस मागे घेण्याची धमकी दिली आहे.

बीड : बीडमधील सुमीत वाघमारे हत्याकांडातील पीडित भाग्यश्री वाघमारेला आरोपींकडून धमक्या येत आहेत. गुन्ह्यातील आरोपी सध्या जामीनावर बाहेर असून भाग्यश्री आणि वाघमारे कुटुंबीयांवर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहे. या घटनेला आता एक वर्ष उलटलं असलं तरी सुमीत वाघमारेची पत्नी आणि त्याचं कुटुंब दहशतीखाली आहे. डिसेंबर 2018 साली बीडमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. प्रेमविवाह केल्याच्या रागातून आरोपीने सख्ख्या बहिणीच्या नवऱ्याचा दिवसाढवळ्या खून केला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. बालाजी लांडगेसह काही आरोपींनी खून केला होता. सुमीत वाघमारे या तरुणाची महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हत्या करण्यात केली होती. या गुन्ह्यातील दोन आरोपी गजानन क्षीरसागर आणि कृष्णा क्षीरसागर हे सध्या जामीनावर बाहेर आहेत. दोघेही गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप भाग्यश्री वाघमारेने केला आहे. दरम्यान वाघमारे कुटुंबाने या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीही भाग्यश्रीला न्यायालय परिसरामध्ये शिवीगाळ झाली होती. त्यानंतर भाग्यश्रीसह वाघमारे कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. प्रेमविवाह केल्याने बायकोच्या भावाकडून तरुणाची हत्या काय आहे प्रकरण? सुमीत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत होता. बीड शहरातील मावशीकडे शिक्षणासाठी सुमीत राहत होता. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या भाग्यश्रीसोबत त्याचे प्रेम जुळले. तब्बल तीन वर्षानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, मात्र दोन्ही कुटुंबियांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. मात्र घरच्यांच्या विरोध झुगारुन भाग्यश्री आणि सुमीतने लग्न केलं. सुमीतशी लग्न केल्याचा राग मनात ठेवूनच भाग्यश्रीच्या भावाने त्याची हत्या केली. इंजिनीअरिंगची परीक्षा देऊन परतत असताना भाग्यश्रीचा भाऊ आणि त्याच्या मित्रांनी सुमीतवर धारधार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सुमीतचा जागीच मृत्यू झाला, तर भाग्यश्री या हल्ल्यात जखमी झाली. हल्ला झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुमीतच्या मदतीसाठी भाग्यश्री याचना करत होती. आरोपींवर अदखलपात्र गुन्हा : अप्पल पोलीस अधीक्षक आरोपींच्या कुटुंबीयांकडून भाग्यश्री आणि वाघमारे कुटुंबाला धमकी मिळत असल्याने अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन, साक्षीदार आणि तक्रारदार यांना वैयक्तिक सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यानंतरही आरोपी अशाप्रकारची कारवाई करत असतील तर विस्तृत चौकशी करुन जामीनावर असलेल्या आरोपींचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल," अशी माहिती बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी दिली.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Embed widget