एक्स्प्लोर
जीप दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू, 12 जण जखमी
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात ही घटना घडली आहे. जीप चालकाचा गाडीवरुन ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचं कळतंय.
सातारा : भोजलिंगाच्या डोंगरावरुन जीप दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात ही घटना घडली आहे. जीप चालकाचा गाडीवरुन ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचं कळतंय.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील वीठलापूर गावचे काही भाविक माण भोजलिंगाच्या दर्शनासाठी डोंगरावर गेले होते. दर्शन करुन परत येत असताना चालकाचा जीपवरील ताबा सुटल्याने जीप 200 ते 250 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात तीन महिला जागीच ठार झाल्या तर एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींवर म्हसवड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.
भोजलींग देवस्थान हे उंच डोंगरावर असून तीथपर्यंत जाण्यासाठी पायी चालत जावं लागतं. मात्र वाहनांना वर जाण्यासाठी डोंगराच्या कडेने कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही दुर्घटना घडली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement