एक्स्प्लोर

Madandas Devi Death : RSS चे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी अनंतात विलीन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी  यांचं 81 व्या वर्षी बंगळुरुत निधन झालं.

Madandas Devi Death : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी (Madandas Devi Death) अनंतात विलीन झाले आहेत. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मदनदास देवी यांचं 81 व्या वर्षी बंगळुरुत निधन झालं. काल 24 जुलैला प्रकृती अत्यावस्थ असल्याने आणि वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. आज सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव मोतीबागेतील कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अमित शाह अन् अन्य राजकारण्यांनी घेतलं अंत्यदर्शन

काल रात्री उशिरा त्यांना पुण्यात आणण्यात आलं होतं. आज सकाळपासून अनेक स्वयंसेवकांनी मोतीबागेत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. त्यासोबतच देवी यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यात आहेत. त्यांच्यासोबत भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनीही देवी याचं अंत्यदर्शन घेतलं सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबाळे देखील देवी यांचं अंत्यदर्शन घेतलं. 

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन शोक व्यक्त केला आहे. 'श्री. मदनदास देवीजी यांच्या देहावसानामुळे अत्यंत दुःख झाले आहे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले. त्यांच्याशी माझे केवळ घनिष्ठ संबंधच नव्हते, तर त्यांच्याकडून मला खूप काही शिकायलाही मिळाले. दुःखाच्या या प्रसंगी ईश्वर सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांना बळ देवो. ओम शांति!', असं त्यांनी ट्वीट केलं आहे. 

मदनदास देवी यांचा अल्प परिचय

मदनदास देवी यांचा जन्म 9 जुलै रोजी झाला. त्यांचं मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आहे. शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात त्यांनी 1956 मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी एम. कॉमनंतर आयएलएस लॉ कॉलेजमध्ये सुवर्णपदकासह एलएलबीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी सनदी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांचे मोठे बंधूही आरएसएसशी निगडीत होते. त्यामुळे त्यांचा संघाशी संबंध आला. मदनदास देवी यांनी बालपणापासूनच आपले आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यासाठी वाहून घेतले. आयुष्यातील जवळपास 70 वर्षे त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले. दैनंदिन शाखेतील स्वयंसेवकापासून सह सरकार्यवाह असा त्यांचा प्रवास झाला. ते 1969 पासून संघ प्रचारक होते

हेही वाचा-

संघाचे माजी सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी घेतलं अंत्यदर्शन

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad: शिवसेनेच्या लोकांनी भोळे राहून फायदा नाही, जो भोळा राहील त्याला मित्रपक्ष गडप करू शकतो : संजय गायकवाड
शिवसेनेच्या लोकांनी भोळे राहून फायदा नाही, जो भोळा राहील त्याला मित्रपक्ष गडप करू शकतो : संजय गायकवाड
Wardha Accident News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंगणघाटमध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हल्सची दुचाकीला जोरदार धडक, तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
PM Modi Speech Independence Day : युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Embed widget