एक्स्प्लोर
Advertisement
माजी खासदार धनंजय महाडिक यांचा 31 ऑगस्ट रोजी भाजप प्रवेश : सूत्र
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसह कॉंग्रेसच्या नेत्यांनी सहकार्य न केल्याने धनंजय महाडिक नाराज होते, त्यामुळेच त्यांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.
कोल्हापूर : कोल्हापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक 31 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सोलापूर भेटीत महाडिक यांचा पक्षप्रवेश होईल, असं म्हटलं जात आहे.
पंतप्रधानांचा सोलापूर दौरा निश्चित होत नसल्याने धनंजय महाडिक यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडला आहे. आता 31 ऑगस्ट रोजी मोदी सोलापूर दौऱ्यावर आल्यास, महाडिक यांचा भाजप प्रवेश होईल. अन्यथा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये जातील. दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री आणि धनंजय महाडिक यांच्यात चर्चा होणार आहे.
धनंजय महाडिक नाराज
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीसह कॉंग्रेसच्या नेत्यांनी सहकार्य न केल्याने धनंजय महाडिक नाराज होते, त्यामुळेच त्यांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापुरातील राष्ट्रवादीचा महत्त्वाचा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला धक्का
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील अनेक आजी, माजी आमदार, खासदारांनी भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश केला. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. या भागातील साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर साताऱ्याचे खासदार उदयनराजे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्याच आता कोल्हापुरातील माजी खासदार धनंजय महाडिकही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्राईम
नाशिक
Advertisement