या प्रकरणात बोलवता धनी कोण? हे जळगावकरांना माहीत : गिरीष महाजन
माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावर गिरीश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जळगाव : शहरातील मराठा विद्या प्रसारक संस्थेवर वर्चस्व मिळवण्यासाठी तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने चाकूचा धाक दाखवत धमकवल्याची तक्रार विजय पाटील यांनी रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने खंडणी, चोरीचा कट रचणे, सामूहिक इराद्याने गुन्हेगारी करणे असे कलम लावत गिरीश महाजन यांच्यासह 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुण्यातील असल्यामुळं हा गुन्हा पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी आज गिरीष महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
बोलवता धनी कोण आहे हे जळगावकरांना माहीत : गिरीष महाजन
8 जानेवारी 2018 ला प्रकरण घडलं, आज गुन्हा दाखल झाला आहे, माझ्यावर आरोप केले आहेत की माझ्या सहकाऱ्याने चाकू लावला. घटना पुणे इथ झाली. मात्र, गुन्हा नंदुरबारमध्ये दाखल केला आणि मग केस पुण्याला आली आहे. (झिरो नंबरने) संबंधित संस्थेमध्ये दोन गट असून त्याच्यात टोकाचे मतभेद आहेत. आरोप करणारी व्यक्ती ही जेलमध्ये जाऊन आलेली आहे. त्यांच्या कुटुंबातील लोकंही जेलवारी करुन आलेत. मराठा संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न, असा आरोप आहे. एवढ्या उशिरा गुन्हा नोंदवला आहे. नवीन सरकार आल्यावर एक वर्षाने जाणीवपूर्वक गुन्हा दाखल झाला आहे. यामागे बोलवता धनी कोण आहे हे जळगावकरांना माहीत आहे. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून गुन्ह्यात तथ्य असेल तर वाटेल ती शिक्षा भोगेल, असे स्पष्टीकरण माजी मंत्री गिरीष महाजन यांनी दिले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण? या प्रकरणाची सुरुवात जळगाव शहरातील मराठा विद्या प्रसारक संस्थेपासून झाल्याच पाहायला मिळत आहे. या संदर्भात फिर्यादी अॅड. विजय पाटील यांनी म्हटलं आहे की संस्थेवर आपलं वर्चस्व राहावं यासाठी गिरीश महाजन यांनी मराठा संस्थेच्या संचालकांनी राजीनामे राजीनामे आपल्या समर्थकांकडे सुपूर्द करावे असा आग्रह धरला होता. यासाठी मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक अॅड. विजय पाटील यांना संस्थेचे कागद पत्र असलेले दप्तर घेऊन चर्चे साठी पुण्यात एका हॉटेल मध्ये भेटी साठी बोलविले होते या ठिकाणी प्रत्यक्ष गिरीश महाजन हे उपस्थित नसले तरी त्यांचे जवळचे समर्थक रामेश्वर नाईक, सुनील झंवर यांच्या सह काही कार्यकर्ते उपस्थित हो. त्यांनी अॅड. विजय पाटील यांना संस्था गिरीश महाजन यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या ताब्यात हवी आहे अशी भूमिका सांगितली होती. किंबहुना त्यांनी त्यासाठी काही रक्कमही देऊ केली होती मात्र विजय पाटील आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यानं हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. यावेळी व्हिडीओ कॉल द्वारे गिरीश महाजनही विजय पाटील यांच्याशी बोलले होते.
असं असलं तरीही, मात्र तरीही विजय पाटील यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार काम करण्याची तयारी दर्शवली नाही म्हणूंन रामेश्वर नाईक, सुनील झंवर यांट्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांनी चाकूचा धाक दाखवत धमकवल्याची तक्रार विजय पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने खंडणी, चोरीचा कट रचणे, सामूहिक इराद्याने गुन्हेगारी करणे असे कलम लावत गिरीश महाजन यांच्या सह 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुण्यातील असल्यामुळं हा गुन्हा पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.