एक्स्प्लोर

सणासुदीच्या काळात मिठाई आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करू नका, अन्न व औषध प्रशासन विभागाचा व्यावसायिकांना इशारा

गणेशोत्सव काळात मिठाईला देखील मोठी मागणी होत असते. मात्र अनेक व्यावसायिक हीच संधी साधत मिठाई पदार्थांमध्ये भेसळ करत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग आता सतर्क झाला.

मुंबई : गणेशोत्सव आणि आगामी सणोत्सवाच्या काळात मिठाई आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करू नका तसेच नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहोचेल असे कृत्य केल्यास कठोर कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहा असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाकडून व्यावसायिकांना देण्यात आला आहे. दरम्यान मिठाईमध्ये भेसळ कशी ओळखायची? व्यावसायिकांनी नियमांचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकते?

लाडक्या गणरायाचं आगमन आता काही दिवसांवर आले असून घरोघरी हा बाप्पा विराजमान होणार आहे. बाप्पाच्या स्वागताची तयारी सर्वत्र जोरदार सुरु असून आकर्षक सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठाही सजून गेल्या आहेत. विशेष म्हणजे गणेशोत्सव काळात मिठाईला देखील मोठी मागणी होत असते. मात्र अनेक व्यावसायिक हीच संधी साधत मिठाई पदार्थांमध्ये भेसळ करत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग आता सतर्क झाला. नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहोचेल असे कृत्य केल्यास कठोर कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहा असा इशारा त्यांच्याकडून व्यावसायिकांना देण्यात आला आहे.

 नाशिकच्या सातपूर परिसरातील नाईस हॉलमध्ये सोमवारी अन्न व औषध प्रशासन विभागाची जिल्ह्यातील मिठाई, हॉटेल, किराणा आणि भगर व्यावसायिकांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत त्यांना हा इशारा देत जनजागृती देखील केली गेली. विशेष म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय केला नाही तर पाच लाख रुपयांपर्यंत दंड तसेच कारावास आणि जन्मठेपेची देखील शिक्षा व्यवसायिकांना भोगावी लागणार असल्याने सूचनांचे पालन करा असं आवाहन प्रशासनाकडून केलं जातय.

 प्रशासनाकडून मिठाई व्यवसायिकांना देण्यात आलेल्या मुख्य सूचना 

  • आस्थापनेचा परीसर हा पर्यावरणीय दूषिते व किटकांपासून संरक्षित व स्वच्छ असावा
  • कच्चे अन्नपदार्थ परवानाधारक/ नोंदणीधारक अन्न, व्यवसायिकांकडून खरेदी करण्यात यावेत
  •  पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा
  • अन्नपदार्थ हे स्वच्छ व सुरक्षित ठिकाणीच साठवणूक करावेत
  • आजारी असल्यास अन्न पदार्थ हाताळण्यात येऊ नयेत
  • मिठाई तयार करतांना केवळ फूडग्रेड खाद्यरंगाचा 100  PPM च्या आतच वापर करावा
  • मिठाईच्या ट्रे वर दर्शनी भागात वापरण्यायोग्य दिनांक टाकावा
  • बंगाली मिठाई ही 24 तासांच्या आत खाण्याबाबत पॅकेजिंग मटेरियलवर निर्देश देण्यात यावेत
  • मिठाई बनवतांना तसेच हाताळणाऱ्या व्यक्तींनी नेहमी डोक्यावर टोपी, मास्क, हातमोजे व स्वच्छ अॅप्रन वापरावे.
  • मिठाईवर वापरला जाणारा सोनेरी व चांदीचा वर्ख योग्य दर्जाचे व उच्च प्रतीचे असावे
  • मिठाई हाताळतांना हात वारंवार स्वच्छ धुवावे  
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे

मिठाई अधिक रंगीबेरंगी असल्यास तिच्यामध्ये भेसळ असू शकते तसेच अशा पदार्थांची चवही  वेगळी लागते, अशा प्रकारच्या मिठाई झाकलेल्या अवस्थेत असतात. मिठाईवर चांदीच्या ऐवजी अल्युमिनिअमचा वर्ख असल्यास किंवा अस्वच्छ वाटल्यास त्या खरेदी करू नये.

नागरिकांना अशाप्रकारे कुठेही भेसळ आढळल्यास किंवा तक्रार करायची असल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असून विक्रेत्यांनो काळजी घ्या. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी मिळणार 15 हजार रुपये
Maharashtra Live blog updates: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी मिळणार 15 हजार रुपये
Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत व्हीएसआर कंपनीचा मालक सीआयडीच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, 'माझी चूक असेल, तर मला...'
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत व्हीएसआर कंपनीचा मालक सीआयडीच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, 'माझी चूक असेल, तर मला...'
Mumbai Crime : 14 वर्षीय मुलाच्या अपहरणचा तब्बल तीन महिन्यानंतर छडा; मुंबई गुन्हे शाखेने राजस्थानमधून केली सुटका, कॅटरिंगच्या कामाला जुंपणाऱ्या दोघांना बेड्या
दिंडोशीतील 14 वर्षीय मुलाच्या अपहरणचा तब्बल तीन महिन्यानंतर छडा; मुंबई गुन्हे शाखेने राजस्थानमधून केली सुटका, कॅटरिंगच्या कामाला जुंपणाऱ्या दोघांना बेड्या
Nagpur Buffalo Attack : कुत्रा चावल्याने म्हैस चिडली, रस्त्यावरुन जाणाऱ्या आजोबांना जोरात धडक देऊन आपटलं, नागपूरमधील जखमी वृद्धाचा मृत्यू
कुत्रा चावल्याने म्हैस चिडली, रस्त्यावरुन जाणाऱ्या आजोबांना जोरात धडक देऊन आपटलं, नागपूरमधील जखमी वृद्धाचा मृत्यू

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Embed widget