एक्स्प्लोर
रत्नागिरीतील मच्छिमारांच्या जाळ्यात दुर्मिळ 'फ्लाईंग फिश'
रत्नागिरी : रत्नागिरीतील गुहागरच्या असगोली येथील मच्छिमारांना पंख असलेले दोन दुर्मिळ ‘फ्लाईंग फिश’ मासेमारी करताना जाळयात सापडले. समुद्रावर आलेल्या पर्यटकांना हा मासा दाखविल्यानंतर मच्छिमारांनी त्याला समुद्रात सोडून दिलं . अनेक वेळा रत्नागिरीच्या समुद्रात या प्रजातीचे उडणारे मासे आढळतात.
असगोली येथील स्थानिक मच्छिमार पहाटे तीन वाजता ‘गंगाकृपा’ ही होडी घेऊन मासेमारीसाठी गेले होते. रानवी ते असगोली या परिसरात समुद्रात मासेमारी करताना त्यांच्या जाळ्यात पंख असलेले दोन मासे सापडले. जाळं ओढल्यावर जीवंत असलेल्या या माशांना त्यांनी होडीतील पाण्यात ठेवून दिलं होतं. सकाळी 8.30 च्या सुमारास मासेमारी संपवून ते असगोलीला परतले. त्यावेळी असगोलीतील समुद्रकिनार्यावर उपस्थित असलेल्या पर्यटकांना त्यांनी पंख असलेले मासे दाखविले. त्यानंतर या माशांना समुद्रात सोडून जीवदान देण्यात आले.
समुद्रात मासेमारीला गेल्यावर अनेक वेळा पाण्यावरुन उडताना असे मासे दिसतात. परंतु हे मासे अर्थात फ्लाईंग फिश सहसा जाळ्यात अडकत नाहीत . मात्र यावेळी हे मासे असगोलीतील मच्छिमारांच्या जाळयात सापडले.
फ्लाईंग फिशची वैशिष्ट्य
- या माशांची लांबी सुमारे 1 फूट आहे.
- समुद्रामध्ये फ्लाईंग फीशच्या 40 प्रजाती सापडतात.
- त्याच्या पंखाना पेक्ट्रोल फीन्स असे म्हणतात.
- अटलांटिक महासागर, पॅसिफीक महासागर व अरबी समुद्रातील उबदार पाण्याच्या प्रवाहात हे मासे आढळतात.
- समुद्राच्या पाण्यात 60 किमी प्रती तास वेगाने हे मासे प्रवास करतात.
- समुद्राच्या पाण्यावर 4 फूट उंचीवर ते जाऊ शकतात.
- हवेतून 200 मीटरचे अंतर हा मासा उडू शकतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement