एक्स्प्लोर
Floor Test : मनसेच्या एकमेव आमदाराचा पाठिंबा कोणाला?
राज्यातील जनतेला एक महत्त्वाचा प्रश्न पडला आहे की, आज बहुमत चाचणीवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी कोणाच्या बाजूने मतदान केले.
![Floor Test : मनसेच्या एकमेव आमदाराचा पाठिंबा कोणाला? Floor Test - Whom Did MNS MLA Raju patil support Floor Test : मनसेच्या एकमेव आमदाराचा पाठिंबा कोणाला?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/11/30174232/Raju-Patil-and-Raj-Thackeray.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाविकासआघाडी सरकारची बहुमत चाचणी अखेर पार पडली. या बहुमताच्या परीक्षेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सरकार पास झाले आहे. या चाचणीत महाविकास आघाडीला 169 सदस्यांनी मतदान केले तर त्यांच्या विरोधात शून्य सदस्यांनी मतदान केले. या बहुमताच्या चाचणीनंतर महाविकास आघाडीच्या सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यापूर्वीच त्यांनी त्यांचे बहुमत सिद्ध केले.
आज (30 नोव्हेंबर) दुपारी 2 वाजता विधानसभेचे कामकाज सुरु झाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे आमदार आणि इतर अपक्ष मिळून त्यांच्याकडे 170 आमदारांचे संख्याबळ होते. त्यापैकी 169 मतं महाविकास आघाडी अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने पडली. आता विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यामुळे लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे.
दरम्यान, राज्यातील जनतेला एक महत्त्वाचा प्रश्न पडला आहे की, आज बहुमत चाचणीवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी कोणाच्या बाजूने मतदान केले. या बहुमत चाचणीवेळी पाहायला मिळाले की, मनसे आमदार राजू पाटील यांनी कोणाच्याही (महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ किंवा विरोधात) बाजूने मतदान न करता तटस्थ राहणे पसंत केले.
मनसेच्या राजू पाटील यांच्यासह असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षाचे दोन आमदार शाह फखर अन्वर (धुळे शहर) आणि मुफ्ती मोहम्मद इस्माईल (मालेगाव मध्य)यांनी तटस्थ मतदान केले. तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकमेव आमदार विनोद निकोले (डहाणू) यांनीदेखील तटस्थ मतदान केले.
फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घेतलं तर भाजपला त्रास का होतोय? जयंत पाटलांचा घणाघात | ABP Majha
कोण होणार उपमुख्यमंत्री? जयंत पाटील म्हणतात...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)