एक्स्प्लोर
Advertisement
खंबाटकी घाटात भीषण पूर, वाहन चालकांच्या काळजाचाही ठोका चुकला!
सातारा : पुणे-बंगळुरु महामार्गावरील खंबाटकी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटात महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. ही पूरपरिस्थिती एवढी भीषण होती, की वाहन चालकांचाही थरकाप उडाला.
खंबाटकी घाट परिसरात काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाल्याने पावसाचे पाणी घाटवळणावरुन रस्त्यावर आल्याने काहीकाळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या रौद्ररूप धारण केलेल्या प्रवाहाकडे पाहताना प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकत होता.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चे पुणे ते सातारा दरम्यान सहापदरीकरण करुन रुंदीकरणाचे काम सुरु आहे. या कामादरम्यान पावसाच्या पाण्याला वाट करुन देण्यासाठी तात्पुरती मोरी तयार करण्यात आली आहे.
खंबाटकी घाट परिसरात काल दुपारनंतर झालेल्या पावसानंतर या मोरीतून पाणी रस्त्यावर आलं. सोबत माती आणि राडरोडाही होता. पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे दरड कोसळली असावी असे वाटलं. परंतु तसा प्रकार नव्हता. वरच्या भागातील पाण्याला वाहून जाण्यासाठी केलेली ही सोय होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
सिंधुदुर्ग
वर्धा
निवडणूक
Advertisement