एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मदरशात ध्वजारोहण, 15 हजार विद्यार्थी उपस्थित
नंदूरबार : देशभर भारताचा 70 व्या स्वातंत्र्यदिनाची धामधूम आहे. मोठ्या उत्साहात देशभरात स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो आहे. नंदूरबारमधील अक्क्लकुवामधील जामिया मदरशामध्ये तब्बल 15 हजार मुस्लिम मुलांनी एकत्रित ध्वजरोहण करीत देशाला एकतेचा संदेश दिला.
देशभरात सध्या अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आहे. शिवाय, देशद्रोही शक्तींचा समाना करण्याचं आव्हानही देशासमोर आहे. मात्र, असे असतानाही देशातील कुणा घटकाला दोषी मानून चालणार नाही, याचं उदाहरण म्हणजे अक्कलकुवामधील जामिया संस्था. धार्मिक शिक्षण आणि व्यवसायिक शिक्षणा यांचा मेळ घालणाऱ्या अक्कलकुवातील जामिया संस्थेच्या आवारात यंदा 15 हजार विद्यार्थ्यांनी ध्वजारोहण करत देशात भक्ती आणि एकतेचा संदेश दिला.
विविधतेत एकता असणारा आपला भारत देश आहे. याच विविधतेतील एकतेचा प्रत्यय आज अक्कलकुवात आला. जामिया मदरशातील ध्वजारोहणाचा कार्यक्रम नक्कीच देशातील अनेकांना महत्त्वाचा संदेश देणारा ठरेल, यात शंका नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
ठाणे
Advertisement