एक्स्प्लोर
पाच वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार, उपचाराआधीच मृत्यू
या घटनमुळे गावात तणावाचे वातावरण आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ सामाजिक संघटनांनी श्रीरामपूर बंदची हाक दिली आहे.
शिर्डी : श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका पाच वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचार करण्यात आले असून या चिमुकलीचा उपचारापूर्वीच दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनमुळे गावात तणावाचे वातावरण आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ सामाजिक संघटनांनी श्रीरामपूर बंदची हाक दिली आहे.
पाच वर्षीय चिमुकली घरी आल्यानंतर एकदम चक्कर येऊन खाली पडली. घरच्यांनी तिला श्रीरामपूर येथील कामगार रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. सदर मुलीच्या शरीरावर जखमा असून अधिक वैद्यकीय तपासाअंतीच मृत्यूचे कारण कळू शकेल, असे डॉक्टरांनी सांगितले.
ही चिमुरडी ही दुपारी एकच्या सुमारास घराबाहेर खेळायला गेली आणि घरी आल्यानंतर ती चक्कर येऊन कोसळल्याचे तिच्या वडीलांनी सांगितले. माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधामाला फाशी द्यावी, अशी मागणी पीडीत मुलीच्या वडीलांनी केली आहे.
या अमानुष घटनेनंतर तणावाच वातावरण असून अतयाचार करणाऱ्या नराधामाला तात्काळ अटक करण्याची मागणी मुलीचे नातेवाईक, ग्रामस्थांनी केली आहे. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. तर श्रीरामपूर बंद ठेवण्याचे आवाहन सामाजिक संघटनांनी केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement