एक्स्प्लोर
नालासोपारात समुद्रकिनारी बुडून दोन कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
आज धुळवडीचा आनंद लुटून झाल्यावर वसईतील गोकुलपार्क या इमारतीमध्ये राहणारे मौर्या आणि गुप्ता या दोन कुटुंबातील सात जण कलंब समुद्रकिनारी पोहण्यासाठी दुपारी दोनच्या सुमारास गेले होते.मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही कुटुंबातील पाच जण बुडाले आहेत.
नालासोपारा : नालासोपारा पश्चिमेकडील कलंब समुद्रकिनारी दोन कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज धुळवडीचा आनंद लुटून झाल्यावर वसईतील गोकुलपार्क या इमारतीमध्ये राहणारे मौर्या आणि गुप्ता या दोन कुटुंबातील सात जण कलंब समुद्रकिनारी पोहण्यासाठी दुपारी दोनच्या सुमारास गेले होते.
मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही कुटुंबातील पाच जण बुडाले आहेत. स्थानिकांनी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र ते अयशस्वी झाले. सध्या स्थानिक गावकरी, पोलीस प्रशासन आणि वसई विरार अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
बुडालेल्यांपैकी एक जणाचा मृतदेह हाती लागला आहे. तर चार जणांचे मृतदेह अजुन सापडले नसल्याची माहिती मिळत आहे. या चार जणांचे मृतदेह शोधण्याचे कार्य सध्या सुरु आहे. अंधार असल्याने शोधकार्यामध्ये अडथळा येत आहे. त्यामुळेअग्निशमन दलांच्या जवांनाना शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.
बुडालेल्यांची नावे -
1. निशा कमलेश मौर्या
2. प्रशांत कमलेश मौर्या
3. प्रिया कमलेश मौर्या
4. कंचन दिनेश गुप्ता
5. शितल मुकेश गुप्ता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
बातम्या
जळगाव
राजकारण
Advertisement