(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Girgaon Fire : गिरगावमधील पुंगालिया हाऊस कंपाऊंडमध्ये भीषण आग, सहा कारबरोबर आठ दुचाकी जळून खाक, कोट्यवधी रुपयांचं नुकसान
गिरगाव (Girgaon) येथील पुंगालिया हाऊस (Pungalia House) कंपाऊंडमध्ये भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली.
Girgaon Fire News : गिरगाव (Girgaon) येथील नवाकाळ वृत्तपत्राच्या कार्यालयला लागूनच असलेल्या पुंगालिया हाऊस (Pungalia House) कंपाऊंडमध्ये भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली. मध्य रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत पाच ते सहा मोटार कारबरोबर आठ ते दहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. तर या कंपाउंडमध्ये ठेवलेले लाखो रुपयांचे कपडे, प्लास्टिक आणि नायलॉनचे रोल जळून खाक झाले आहेत. तसेच बाजूच्या दोन घरांनाही आग लागली आहे. फटाक्यानं ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जीवितहानी नाही मात्र नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे
मध्यरात्रीच्या सुमारास पुंगालिया हाऊस कंपाऊंडमध्ये ही आग लागली. आग इतकी भीषण होती की, पाच ते सहा कारबरोबर आठ ते दहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. तसेच तिथे राहणाऱ्या लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. फटाक्यांमुळेच ही आग लागल्याची शक्यता आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमाक दलाच्या जवानांनी अनेक गाड्या बाहेर काढण्यात यश मिळवलं. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमाक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे या आगीमुळं नुकसान झालं आहे.