Pune Diwali: पुण्यात 17 ठिकाणी आगीच्या घटना तर फटाके फोडताना चिमुरडा जखमी
Pune Diwali Fire: शहरात झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीने शहरात 17 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या तर याच रंगबेरंगी फटाक्यांनी पुण्यातील नऱ्हे भागातील एक मुलगा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे: गेल्या दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दिवाळी (Diwali 2022) देशभरात साजरी करण्यात आली. त्यामुळे सर्वच ठिकाणी दिवळाचा उत्साह पाहायला मिळाला. तर लक्ष्मीपूजनाला पुणेकरांनी (Pune News) फटाके फोडण्याचा मनसोक्त आनंद घेतला. काल रात्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर शहरात झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीने शहरात 17 ठिकाणी आगीच्या (Pune Fire) घटना घडल्या तर याच रंगबेरंगी फटाक्यांनी पुण्यातील नऱ्हे (Narhe Pune) भागातील एक मुलगा जखमी झाल्याची (Boy Injured While Bursting Firecrackers) माहिती समोर आली आहे.
फटाके फोडताना चिमुकला जखमी
शिवांश अमोल दळवी असे या जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. काल रात्री दहा वाजल्यााच्या सुमारास ही घटना घडली आहे.जखमी मुलाची प्रकृती आता ठिक असून पण इतर मुलांनी काळजी घ्यावी असं जखमी मुलाच्या नातेवाईकांकडून आवाहन करण्यात आलं आहे. काल रात्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. शिवांश हा रात्री घराबाहेर फटाके फोडत असताना रंगबेरंगी पाऊस पडणारा फटाका फोडताना शिवांश हा जखमी झाला आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर फटाके उडविले जातात. हवेत उडणारे शोभेचे फटाके, उंच हवेत सोडले जाणारे आकाशदिवे यामुळे आगीच्या घटना घडतात. दरवर्षी आगीच्या घटना घडतात. लक्ष्मीपूजनच्या एका दिवसात 17 घटना घडल्याची नोंद अग्निशमन दलाकडे आहे.
फटाके फोडताना काळजी घ्या...
गेल्या काही वर्षापासून सातत्याने पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच फटाके मुक्त दिवाळी साठी अनेक संस्था संघटनांच्या माध्यमातून जनजागृती देखील केली जाते.पण असे असल तरी अशा या फटाक्यांच्या आतिषबाजीने मोठ्या प्रमाणावर आगीच्या घटना घडत आहे. या घटने नंतर पालकांनी देखील खबरदारी घेतली पाहिजे.
सोमवारी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त संध्याकाळी 06.53 ते 08.16 वाजेदरम्यान होता. या दरम्यान मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झालं. परिणामी हवेची गुणवत्ता ढासळली. दोन वर्षानंतर आलेली निर्बंधमुक्त दिवाळी नागरिकांनी उत्साहात साजरी केली. यामुळे हवेची गुणवत्ता मात्र ढासळली. हवेची ढासळलेली लहान मुले, हृदयरुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी धोकादायक आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :