एक्स्प्लोर

राज्यात अवघ्या काही तासात वेगवेगळ्या ठिकाणी अग्नितांडव! मुंबई, सातारा, नागपुरात आगीच्या घटनेने एकच खळबळ

Fire Accident: राज्यात गेल्या काही तासात वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यात नागपूर, मुंबई उपनगरातील चेंबूर आणि सताऱ्यातील पाचगणीत आगीच्या घटना घडल्या आहे.

Fire Accident: राज्यात गेल्या काही तासात वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे सर्वत्र नवरात्रीचा उत्साह सुरू असताना त्यावर विरजण घालणारा प्रकार मुंबई उपनगरातील चेंबूर (Chembur) परिसरात घडला आहे. यात एका चाळीतील दुमजली घराला लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी पहाटे सिद्धार्थ नगर परिसरात ही दुर्घटना घडली. येथील चाळीत अनेक वन प्लस वन स्ट्रक्चरची घरे आहेत. यापैकी एका घराला अचानक आग (Fire Accident) लागली. या घरातील कुटुंबीयांना वेळीच आग लागल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे एकाच कुटुंबातील 7 जणांचा झोपेत असताना होरपळून मृत्यू झाला.

यामध्ये 7 वर्षांच्या एका मुलीचाही समावेश आहे. या सगळ्यांना अग्निशमन दलाने घरातून बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर अशीच एक आगीची घटना सताऱ्यातील पाचगणीच्या भाजी मंडइमध्ये घडली. यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. तर आणखी एक घटना नागपुरात देखील घडली आहे.

नागपुरातील एम्प्रेस मॉलमध्ये आग,कपड्याच्या दुकानांचे नुकसान 

नागपुरातील एम्प्रेस मॉलमधील ग्राऊंड फ्लोअरवरील दुकानाला  काल, शनिवारच्या रात्री अचानक आग लागली. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक अंदाजानुसार शॉक सर्किटमुळे आग लागली असल्याचं बोललं जात आहे. आग लागली त्यावेळी मोठ्या प्रमाणात लोकं मॉलमध्ये असल्याने एकच खलबळ उडाली. दरम्यान, एकच पळापळ सुरू झाल्यानं सुरक्षा रक्षकांनी नागरिकांना मॉलच्या बाहेर काढले. त्यानंतर तात्काळ अग्निशामक विभागाचे तीन बंब पोहोचल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात काही वेळात यश मिळाले. मात्र कपड्याच्या दुकानाची ही आग लगतच्या दोन ते तीन दुकानांमध्ये पसरली आणि त्यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालेला नाही. मात्र या आगीने सर्वत्र खळबळ पसरली होती.

सताऱ्यातील पाचगणीच्या भाजी मंडइत अग्नितांडव 

दरम्यान, अशीच एक आगीची घटना सताऱ्यातील पाचगणीच्या भाजी मंडइमध्ये घडली. शनिवारच्या रात्री ही अचानक आग लागली. या आगीत अनेक भाजीची दुकाने जळून खाक झाली. यात शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान,पहाटे ही आग आटोक्यात आली. यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. सध्या या प्रकरणाचा तपास पाचगणी पोलीस करत आहेत.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
JP Duminy : दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
Ind vs Ban U19 Asia Cup 2024 Final : आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar on Madhukar Pichad Demise : जुना सहकारी हरपला, मधुकर पिचडांच्या निधनावर शरद पवार भावूकChandrashekhar Bawankule : Raj Thackeray आणि आमचे विचार जुळतात, बावनकुळेंचं सूचक वक्तव्यDevendra Fadnavis on Raj Thackeray : पालिका निवडणुकीत जिथं शक्य तिथं राज ठाकरेंना सोबत घेणार :फडणवीसCongress Rajya Sabha : राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकाखाली 500 च्या नोटा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
JP Duminy : दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
Ind vs Ban U19 Asia Cup 2024 Final : आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
Devendra Fadnavis & Raj Thackeray: भाजप राज ठाकरेंच्या मनसेला सत्तेत वाटा देणार का? खातेवाटपापूर्वी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
भाजप राज ठाकरेंच्या मनसेला सत्तेत वाटा देणार का? खातेवाटपापूर्वी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली, दिलजितच्या कार्यक्रमात दीपिका पादुकोणने धरला ठेका; व्हिडीओ समोर!
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली, दिलजितच्या कार्यक्रमात दीपिका पादुकोणने धरला ठेका; व्हिडीओ समोर!
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
Embed widget