एक्स्प्लोर
'त्या' चिमुरड्याच्या मृत्यूप्रकरणी पालिका अधिकाऱ्यावर गुन्हा
नागपूर : नागपूर महापालिकेच्या अधिकाऱ्याविरोधात निष्काळजीपणा मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उघड्या सेप्टिक टँकमध्ये पडून चिमुरड्याच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
15 मार्च 2016 ला मानवसेवा नगरमधील उद्यानात 8 वर्षीय मुलाचा उघड्या सेप्टिक टँकमध्ये पडून मृत्यू झाला. महापालिकेच्या या उद्यानातील उघड्या सेप्टिक टँकबद्दल नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र पालिकेनं त्याकडे दुर्लक्ष केलं.
गुरफान अली हा 8 वर्षांचा मुलगा खेळता खेळता सायकलसह टँकमध्ये पडला. याप्रकरणी तपासानंतर महापालिका दोषी असल्याचा निष्कर्ष काढत पालिकेच्या अधिकाऱ्याविरोधात कलम '304 अ' नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नेमका कोणता अधिकारी दोषी हे महापालिकेनं ठरवावं, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement