एक्स्प्लोर
सोलापुरात शासकीय रुग्णालयाच्या आवारात दोन गटात तुफान हाणामारी
सोलापूर : सोलापुरात शासकीय रुग्णालयाच्या आवारात दोन गटात तुफान हाणामारी झाली. पूर्व वैमनस्यातून दोन्ही गटाकडून एकमेकांवर सशस्त्र हल्ला करण्यात आला.
लोकमान्य नगरमधील शासकीय रुग्णालयात ही घटना घडली. 50 जणांच्या जमावाने ओपीडी मध्ये घुसून सात जणांवर तलवार आणि सत्तूरने प्राणघातक हल्ला केला. त्यांच्यावर त्याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा तैनान करण्यात आला आहे. तर रुग्णालयातही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, शहर पोलिसांनी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन केलं. लोकमान्य नगर, नई जिंदगी आणि विजापूर वेशीत हे कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं. दहशत माजवणाऱ्या दोन्ही गटातील उपद्रवींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement