एक्स्प्लोर
Advertisement
मध्यरात्री प्रसूतीवेदना, बापानं मुलीला कचऱ्याच्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये नेलं
अमरावती : रिक्षावाल्यांनी येण्यास नकार दिल्यानं 8 महिन्यांच्या गर्भवतीला कचरा टाकण्याच्या सायकल रिक्षातून रुग्णालयात दाखल करावं लागलं. अमरावतीतल्या मोझरी गावात ही घटना घडली आहे. रात्री उशिरा महिलेला प्रसूतीवेदना सुरु झाल्या. मात्र एकाही रिक्षावाल्यानं हॉस्पिटलमध्ये येण्यास होकार न दिल्यानं महिलेला कचऱ्याच्या सायकलमधून न्यावं लागलं.
दुर्गा डोंगरे ही आठ महिन्यांची गर्भवती बाळंतपणासाठी माहेरी आली होती. काल मंगळवारी रात्री 10 वाजता तिला प्रसुतीवेदना सुरु झाल्या. तिला मोझरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करायचं होतं. दुर्गाच्या भावानं आणि बाबांनी गावात रिक्षाचा शोध सुरु केला. रात्री दोन वाजेपर्यंत गावातल्या प्रत्येक रिक्षाचालकांच्या दारात जाऊन बापलेकानं मदतीची विनवणी केली. मात्र एकाही रिक्षाचालकाला पाझर फुटला नाही.
अखेर रात्री 3 वाजता कचरा घेऊन जाणाऱ्या तीन चाकी कटला म्हणजेच सायकलरिक्षात बसवून दुर्गाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तातडीनं मिळालेल्या उपचारानं दुर्गाची सुखरुप प्रसूती झाली. मात्र काल रात्रीच्या प्रकारानं प्रधान कुटुंबियांना रिक्षाचालकांकडून चांगलाच अनुभव मिळाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बीड
महाराष्ट्र
विश्व
Advertisement