एक्स्प्लोर
देशाचा पोशिंदा ऐतिहासिक आंदोलनाच्या तयारीत!
अहमदनगर: शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. येत्या 1 जूनपासून शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. शेतकरी संपासंदर्भात अहमदनगरच्या पुणतांब्यात आज ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. नगर, औरंगाबादसह राज्यभरातील शेतकरी या ग्रामसभेसाठी पुणतांब्यात पोहोचले आहेत.
‘शेतमालाला योग्य भाव द्या अन्यथा शेतमाल विकणार नाही’, अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी संपाचा इशारा दिला. हा संप अधिक व्यापक करण्यासाठी पुणतांब्यातील ग्रामसभेत आज महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ‘शेतकरी संपावर जातोय, याचा अर्थ देश अराजकतेकडे जात आहे.’ असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी येत्या 28 एप्रिलपासून राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे. शेतकरी कर्जमाफीच्या नावानं राजकीय स्वार्थ साधण्यासाठीच विरोधकांनी संघर्षयात्रा काढल्याचा घणाघातही राजू शेट्टींनी केला आहे.
संबंधित बातम्या:
पहिल्यांदाच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संपाचा इशारा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement