एक्स्प्लोर
Advertisement
नाशिक, पुणतांब्यातील शेतकरी संपावर ठाम
मुंबई: मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शेतकरी संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली असली, तर शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं चित्र आहे.
पुणताब्यांतील कोअर कमिटीच्या शेतकऱ्यांमधील मतभेद आहेत. तर नाशिकमधील किसान क्रांतीनेही शेतकरी संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये आज कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय़ घेण्यात आला. तर उद्या राज्यातील शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. उद्या संध्याकाळी ४ वाजता नाशिक बाजार समितीत ही बैठक होणार आहे.
पुणतांब्यात निदर्शने
मुख्यमंत्र्यांनी 100 टक्के मागण्या मान्य न केल्यानं आज पुणतांब्यात शेतकऱ्यांनी कोअर कमिटीच्या विरोधात निदर्शनं केली. यापूर्वी जे शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटले होते, त्या शेतकऱ्यांनी, काल मुख्यमंत्रांना भेटायला गेलेल्या शेतकऱ्यांविरोधा निदर्शने केली.
तसंच आम्ही संपावर ठाम असल्याचं काही गावकऱ्यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्र्यांनी आम्हाला यापेक्षा अधिक मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यापेक्षा कमीच मागण्या मान्य झाल्या, असं म्हणत पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्याच गावातील कोअर कमिटी सदस्यांचा निषेध केला.
मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दोन महिन्यांचा अवधी दिला होता, मात्र ही कोअर कमिटी कोणताही ठोस निर्णय न घेता मागे आली. तसंच ग्रामसभा घेऊन संप मागे घ्यायचा की नाही हे ठरलं होतं, मात्र त्यांनी तिकडेच संप मागे घेत असल्याचं जाहीर केल्याने, आम्ही त्यांचा निषेध करतो, असं गावकरी म्हणाले.
नाशिकमध्ये संप कायम
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली असली तरी तिकडे नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या कोअर कमिटीनं संप मागे घेतलेला नाही. कोअर कमिटीची आज बैठक झाली.
महाराष्ट्र किसान सभा अजूनही संपावर ठाम
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली असली, महाराष्ट्र राज्य किसान सभा मात्र संपावर अजूनही ठाम आहे.
संपूर्ण कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाही, तोवर संप मागे घेणार नाही, असं महाराष्ट्र किसान सभेने म्हटलं आहे.
साडेबारा ते साडेचार, ‘वर्षा’वर नेमकं काय घडलं?
“संपूर्ण चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शेतकरी सदस्यांना गुंडाळलं, सदस्यांची दिशाभूल केली आहे. संपूर्ण कर्जमाफीची मागणी मान्य केलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी गोलमाल उत्तरं दिली आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारं आहे. संपूर्ण कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाही, तोवर संप मागे घेणार नाही”, असं महाराष्ट्र किसान सभेने म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
महाराष्ट्र किसान सभा अजूनही संपावर ठाम
साडेबारा ते साडेचार, ‘वर्षा’वर नेमकं काय घडलं?
नाशिक, पुणतांब्यातील शेतकरी संपावर ठाम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement