एक्स्प्लोर

तीन वर्षांपूर्वी मयत अधिकाऱ्याची बदली, लिपिक निलंबित

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागातील तीन वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याची बदली केल्याने लिपीकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी विभागाच्या कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कार्यालयातील तत्कालीन लिपिकाचे निलंबन करण्यात आले असून संबंधित अधीक्षकास यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.   दुय्यम निरीक्षकाचे निधन झाल्याबाबतचा अहवाल शासनाकडे न पाठवल्याने त्यांचा विभागाच्या नियतकालिक बदल्यांमध्ये समावेश करण्यात आला होता. राज्य उत्पादन शुल्क आयुक्तालया अंतर्गत राज्यस्तरीय संवर्गातील दुय्यम निरीक्षक (गट-क) पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी 181 कर्मचाऱ्यांच्या शासनाने बदल्या 7 जुलै रोजी केल्या होत्या. या बदल्यांच्या आदेशात एस.एम. साबळे यांची कोल्हापूर येथून नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील भरारी पथकात बदली करण्यात आली होती.   कोल्हापूर अधीक्षक कार्यालयाकडून कर्मचाऱ्याचा अद्ययावत सेवा तपशील न मिळाल्याने मुंबईतील आयुक्त कार्यालयाकडे असलेल्या तपशीलावरुन बदलीस पात्र कर्मचाऱ्यांच्या यादीतील साबळे यांचं नाव बदलीसाठी काढण्यात आलेल्या आदेशात समाविष्ट करण्यात आलं होतं. मात्र साबळे यांचे 2013 मध्ये निधन झाल्याचे त्यानंतर लक्षात आलं. त्यामुळे आयुक्तालयामार्फत तातडीने साबळे यांच्या बदलीचे आदेश न पाठण्याबाबत कोल्हापूर विभागीय आयुक्त आणि राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांना कळवण्यात आलं.   कोल्हापूरच्या जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून साबळे यांचे निधन झाल्याबाबतचा अहवाल आयुक्तालयास प्राप्त न झाल्याने हा प्रकार घडल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे या दिरंगाईस जबाबदार असणाऱ्या जिल्हा अधीक्षक कार्यालयातील लिपीकास निलंबित करण्यात आले असून संबंधित अधीक्षकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण आज सरकारकडून देण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget