MPSC च्या गट 'क'सह 'या' परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ
MPSC Exam : 17 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
MPSC Exam : एम पी एस सी कडून गट क च्या आणि दिवाणी न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी पदासाठी घेण्यात येणार्या परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याठी तात्काळ मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता विद्यार्थी 17 जानेवारीपर्यंत या पदांसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करु शकणार. ज्या वेबसाईटवर या परीक्षांसाठी अर्ज दाखल करायचे होते ती वेबसाईट आठ जानेवारीपासून बंद झाल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले होते. ए बी पी माझाने ही बाब समोर आणल्यावर आयोगाकडून याची लागलीच दखल घेण्यात आली. 17 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची अर्ज सादर करण्याची व ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्यासाठीची तारीख ही 13 जानेवारी 2022 ही होती. पण आता मुदतवाढ झाल्यानंतर या परीक्षेचा अर्ज भरण्याची आणि शुल्क भरण्याची तारीख ही 17 जानेवारी 2022 पर्यंत करण्यात आली आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे शुल्क बँकेमध्ये चलनाद्वारे भरण्याची सुधारित तारीख ही 20 जानेवारी 2022 अशी करण्यात आली आहे.
तसेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षे अर्ज सादर करण्याची आणि ऑनलाईम पद्धतीने शुल्क भरण्यासाठीची यापूर्वीची तारीख ही 15 जानेवारी होती परंतु मुदत वाढ झाल्यानंतर ही तारीख 17 जानेवारी करण्यात आली आहे. तसेच या परीक्षेचे परीक्षेचे शुल्क बँकेमध्ये चलनाद्वारे भरण्याची सुधारित तारीख ही 20 जानेवारी 2022 अशी करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
सर्व पळवाटा बंद, आता दुकानांच्या पाट्या मराठीतच, ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
मराठी पाट्यांसंदर्भात श्रेय घेण्याचा आचरटपणा कुणी करु नये, राज ठाकरेंचा राज्य सरकारला टोमणा
दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकरला भारतात आणण्याचे प्रयत्न अयशस्वी, पाकिस्तानात असल्याची माहिती
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा