एक्स्प्लोर

Padmakar Valvi: 'आदिवासी क्षेत्रातून शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपाला हद्दपार करा', काँग्रेसमधून नुकतेच भाजपात आलेल्या नेत्याचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

Padmakar Valvi: काँग्रेस पक्षातून भाजपात आयात केलेल्या माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी आंदोलन सुरू आहे. त्याचबरोबर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील राज्यात आंदोलन करत आहेत. अशातच धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून नंदुरबार मध्ये आदिवासी समाज आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. तर काँग्रेस पक्षातून भाजपात आयात केलेल्या माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

एकनाथ शिंदे हा मूर्ख नालायक आणि बेरड मुख्यमंत्री असल्याचं माजी मंत्री पद्माकर वळवी (Padmakar Valvi) यांनी म्हटलं आहे. तर जो सरकार किंवा पक्ष आदिवासींच्या विरोधात निर्णय घेईल त्याला जमिनीत गाडल्या शिवाय शांत बसायचं नाही, असा पवित्रा देखील त्यांनी यावेळी घेतला आहे. आदिवासी आमदार खासदारांनी राजीनामा देण्याची गरज नाही. सरकार निवडणुकीच्या उद्दिष्टाने धनगर समाजाला बसवण्याच्या काम करत आहे. आदिवासी क्षेत्रातून शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपाला हद्दपार करा, असं काँग्रेसमधून नुकतेच भाजपात गेलेल्या पद्माकर वळवी (Padmakar Valvi) यांनी म्हटलं आहे. 

आदिवासींचे हक्क, आरक्षण, घटनात्मक तरतुदी याच्याबाबतीमध्ये आम्ही आदीवासी पुढारी म्हणून कधीच तडजोड केली नाही. पण, सरकारमध्ये आम्ही मंत्री असताना आम्ही सरकारला सांगत आलो आहोत, आदीवासींच्या हक्कांवर तुम्ही गदा आणू शकत नाही. आम्ही राज्यामध्ये आमदार म्हणून मंत्री म्हणून काम केलं आहे, पंरतू आज धनगरांच्या, आदिवासींच्या बाबतील पैसा कायदा असेल त्याबाबत ज्या भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत आहेत. त्यातून राज्याला मुर्ख मुख्यमंत्री राज्याला मिळाला आहे, असं पद्माकर वळवी (Padmakar Valvi) यांनी यावेळी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्याचे सल्लागार अतिशय चुकीचे आहेत, त्याचे सल्लागार कोण आहेत माहिती नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आदीवासींच्या भावनांशी खेळू नये. आदिवासींनी कधीच काही मागितलेलं नाही. राजकारणापायी आदिवासींचा बळी घेण्याचं काम सुरू आहे. मी कोणत्या पक्षात आहे, याचा विषय नाही. पण जो पक्ष आदिवाींच्या विरोधात निर्णय घेईल त्याला जमिनीत गाडल्याशिवाय राहायचं नाही, त्यांना दाखवून द्या आदिवासी कोण आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. आदिवासी आमदार खासदारांनी राजीनामा देण्याची गरज नाही. त्यांनी फक्त धमक्या द्या, असंही पद्माकर वळवी (Padmakar Valvi) यांनी म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rain Update: राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पिकांना मोठा फटका, अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही पावसाचे सावट 
राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पिकांना मोठा फटका, अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही पावसाचे सावट 
Amit Shah In Kolhapur : अमित शाहांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा; कोल्हापुरात 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याची धरपकड
अमित शाहांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा; कोल्हापुरात 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याची धरपकड
मोठी बातमी! मनोज जरांगे उपोषण सोडणार, निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत वाट बघणार, देवेंद्र फडणवीसांना अल्टिमेटम
मोठी बातमी! मनोज जरांगे उपोषण सोडणार, निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत वाट बघणार, देवेंद्र फडणवीसांना अल्टिमेटम
Devendra Fadnavis: 'सारथी'मुळे मराठा तरुण बडे अधिकारी झाले; आज मराठा तरुण नोकऱ्या देणारे झालेत: देवेंद्र फडणवीस
'सारथी'मुळे मराठा तरुण बडे अधिकारी झाले; आज मराठा तरुण नोकऱ्या देणारे झालेत: देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah Nashik Visit : गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे नाशकात रस्त्यांची दुरवस्थाABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 1 PM :  25 Sept 2024 : ABP MajhaChandrashekhar Bawankule:बावनकुळेंच्या संस्थेला शासकीय भूखंड, महसूल विभागाची शिफारस होती: विखे-पाटिलCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 25 September 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पिकांना मोठा फटका, अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही पावसाचे सावट 
राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पिकांना मोठा फटका, अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही पावसाचे सावट 
Amit Shah In Kolhapur : अमित शाहांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा; कोल्हापुरात 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याची धरपकड
अमित शाहांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा; कोल्हापुरात 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याची धरपकड
मोठी बातमी! मनोज जरांगे उपोषण सोडणार, निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत वाट बघणार, देवेंद्र फडणवीसांना अल्टिमेटम
मोठी बातमी! मनोज जरांगे उपोषण सोडणार, निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत वाट बघणार, देवेंद्र फडणवीसांना अल्टिमेटम
Devendra Fadnavis: 'सारथी'मुळे मराठा तरुण बडे अधिकारी झाले; आज मराठा तरुण नोकऱ्या देणारे झालेत: देवेंद्र फडणवीस
'सारथी'मुळे मराठा तरुण बडे अधिकारी झाले; आज मराठा तरुण नोकऱ्या देणारे झालेत: देवेंद्र फडणवीस
Chandrakant Patil : प्रकाश आवाडे गळाला लागताच कोल्हापुरात किती जागा जिंकणार? चंद्रकांत पाटलांनी थेट आकडा सांगितला!
प्रकाश आवाडे गळाला लागताच कोल्हापुरात किती जागा जिंकणार? चंद्रकांत पाटलांनी थेट आकडा सांगितला!
गावात दवंडी पिटत महिलांना बंद पाकिटातून वाटले पैसे, आमदार संतोष बांगरांवर ठाकरे गटाचा मोठा आरोप, निवडणूक आयोगाकडे निवेदन
गावात दवंडी पिटत महिलांना बंद पाकिटातून वाटले पैसे, आमदार संतोष बांगरांवर ठाकरे गटाचा मोठा आरोप, निवडणूक आयोगाकडे निवेदन
मुक्ता आर्टसचा शेअर बनला रॉकेट, एका कराराची अपडेट समोर अन् अप्पर सर्किट लागलं, गुंतवणूकदार झाले मालामाल
सुभाष घईंच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट, एका कराराची अपडेट समोर अन् काही वेळातच अप्पर सर्किट लागलं
Supriya Sule: 'बदला पुरा' मुंबईत देवेंद्र फडणवीसांचं हातात रिव्हॉल्व्हर घेतल्याचं पोस्टर, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल म्हणाल्या, 'मिर्झापूर टिव्ही सिरिजमध्येच...'
'बदला पुरा' मुंबईत देवेंद्र फडणवीसांचं हातात रिव्हॉल्व्हर घेतल्याचं पोस्टर, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल म्हणाल्या, 'मिर्झापूर टिव्ही सिरिजमध्येच...'
Embed widget