एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

International Yoga Day 2023: वयाची साठी तरीही योगसाधनेची महती, समृद्ध शरीरासाठी आजीबाईंचा बटवा

International Yoga Day 2023: आज आंतरराष्ट्रीय योगादिनानिमित्त रत्नागिरीमधील रमा जोग या आजीबाईंनी योगसाधनेचं महत्त्व सांगितलं आहे. तसेच योगसाधनेमुळे या आजीबाईंनी त्यांच मेरुदंडाचं ऑपरेशन देखील टाळलं.

International Yoga Day 2023:  आज आतंरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) आहे. आपलं शरीर निरोगी ठेवणं, या समृध्द शरीराला कोणत्याही प्रकारचा आजार न होऊ देणं अशी प्रत्येक वयोगटातील व्यक्तीची इच्छा असते. त्यासाठी अनेक जण अनेक प्रयत्न देखील करतात. पण आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या शरीराकडे लक्ष देणं फारसं कोणाला जमत नाही. त्यातच हल्लीच्या खाण्याच्या सवयी, झोपेच्या विचित्र वेळा आणि मानसिक तणाव निर्माण करणारा दिनक्रम याने तरुण पिढी अनेक आजारांच्या लवकर स्वाधीन होते. तसेच वयाच्या अगदी 30 मध्येच अनेकांना अनेक औषधं असतात. याच तरुण पिढीला लाजवेल असा एक उत्साह सध्या रत्नागिरीमध्ये आहे. रत्नागिरीच्या रमा जोग या आजबाईंनी वयाच्या साठाव्या वर्षी योगसाधनेला सुरुवात केली आहे. इतकच नव्हे तर या आजीबाईंनी योगसाधना करत त्याचं मेरुदंडाचं ऑपरेशन देखील टाळलं आहे. 

 तरुण पिढीला लाजवणारा रमा आजींचा उत्साह

खरंतर योगसाधना ही मानवी शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आपल्या समृध्द शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योगसाधना ही कायमच उपयुक्त ठरते ही बाब कोणीही नाकारु शकणार नाही. रत्नागिरीच्या रमा जोग या आजीबाईंनी हीच गोष्ट लक्षात ठेवत त्यांनी योगसाधनेला सुरुवात केलीच पण त्यांनी अनेक योगशिक्षक देखील घडवले आहे. एबीपी माझाने योगादिनानिमित्त या आजीबाईंशी खास बातचीत केली. एबीपी माझाशी बोलतांना या आजीबाईंनी सांगितलं की, 'रत्नागिरीला 2007 साली एका शिक्षक योगा शिबिरात मी सहभागी झाले. त्यानंतर मला जिल्ह्याच्या योगशिक्षक पदी निवडण्यात आलं.संपूर्ण जिल्ह्यात त्यानंतर मी योगाशिबिर घेण्यास सुरुवात केली. निरोगी आयुष्यासाठी योगसाधना महत्त्वाची असल्याचा कानमंत्र या आजीबाईंनी तरुण पिढीला दिला आहे.'

कसा असतो रमा आजींचा दिनक्रम?

रमा आजीं या आता संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात नाही कर देशभरात योगाची शिबिरं घेतात. सध्या त्यांच्यावर कोकणातल्या तीस तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली. आता रमा आजी या अगदी हरिद्वारपर्यंत एकटीने प्रवास करतात. रोज सकाळी प्राणायम करुन रमा आजींच्या दिवसाची सुरुवात होते. त्यानंतर त्या त्यांची योग साधनेची शिबिरं घेतात. मग घरातली, बागेतली कामं करणं, त्यांच्या घरातील गाई - गुरांचा काळजी घेणं असा सर्वसाधरणपणे रमा आजींचा दिनक्रम असतो. पण त्या आराम करणं देखील फारसं पसंत करत नाहीत. रमा आजींच्या मते, आपण स्वावलंबी होणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपण सतत काम करत राहिलं पाहिजे. 

रमा आजींनी कसं टाळलं मेरुदंडांचे ऑपरेशन?

 रमा आजींना वयाच्या या टप्प्यावर देखील कोणत्याही प्रकारचा आजार नाही. त्या कोणतीही गोळी देखील घेत नाहीत. पण त्यांना मागील काळामध्ये मेरुदंडाचा त्रास झाला होता. त्यांचा मुलगा डॉक्टर असल्याने त्यांना तात्काळ ऑपरेशन करण्याचा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला. पण रमा आजींनी ऑपरेशन करण्यास साफ नकार दिला. त्यांनी त्यानंतर योगसाधेनचा अवलंब केला. त्यांनी आवश्यक ती सर्व आसनं देखील केली. त्यानंतर त्यांचा मेरुदंडाचा त्रास कमी झाला. त्यामुळे त्यांना ऑपरेशन करण्याची गरज देखील भासली नाही. 

काय आहे रमा आजींचा कानमंत्र?

सध्याच्या मुलांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे पालकांच्या उतार वयात त्यांच्याकडे फारसे लक्ष देता येत नसल्याचं चित्र पाहायला मिळतं. त्यामुळे बऱ्याचदा मुलं पालकांना वृद्धाश्रमात ठेवण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे उतार वयात आपण निरोगी राहयला हवं, तसेच आपण आपली कामं करायला हवीत असं रमा आजींचं म्हणणं आहे. त्यामुळे मुंलावर पालकांना वृध्दाश्रमात ठेवण्याची वेळच येणार नाही असं देखील आजींनी म्हटलं. त्यामुळे आपण आपण स्वत:कृती करत राहणं फार महत्त्वाचं असल्याचं रमा आजींनी सांगितलं. 

रमा आजींचा तरुण पिढीला संदेश

योग साधनेविषयी तरुण पिढीला संदेश देताना रमा आजींनी म्हटलं की, 'योगसाधना करणं हे अतीव सुख आहे, त्यामुळे योगा करणं अतिशय महत्त्वाचं आहे.' तुमचे मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यासाठी योगसाधना महत्त्वाचं असल्याचं रमा आजींनी म्हटलं. तसेच मुलांनी देखील योगा करायला हवा. पण त्यांनी करण्याआधी मोठ्या माणसांनी योगसाधनेचा अवलंब करावा असं देखील त्या म्हणाल्या. 

वयाच्या साठीमध्ये सर्व ट्रॅक पँट घालून या आजीबाईंनी योगाचा ध्यास घेतला आहे. त्यांनी अनेक योग शिक्षकांना घडवलं. अनेक सुखद अनुभव त्यांना त्यांच्या या प्रवासात आल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. आपल्या समृध्द शरीराची आपणच जपवणूक करायला हवी, त्यासाठी आपणच थोडे कष्ट घ्यायला हवेत असं रमा आजींना वाटतं. त्यामुळे रमा आजींच्या हा उत्साह तरुण पिढीसाठी नक्कीच आदर्श ठरेल यामध्ये शंका नाही. 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
राज ठाकरे किंगमेकर ठरणार?; 4 जागा निर्णायक ठरणार, एक्झिट पोलचा अंदाज, मनसे कोणाला साथ देणार?
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Embed widget