एक्स्प्लोर

कोरोना योद्ध्यांची मृत्यूनंतरही परवड, केवळ 27 टक्के कुटुंबांनाच 50 लाखांच्या विमा योजनेचा लाभ

आरोग्य विभागातील कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांना वाचवत आहेत. यात बळी पडलेल्या कर्मचाऱ्यांपैकी केवळ 27 टक्के कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाच केंद्र सरकारने विमा मंजुर केला आहे. 

मुंबई : प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत कोरोना विरुद्ध लढ्यामध्ये सामील असलेल्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना 50 लाखाचा विमा देण्यात येतो. या योजनेची सुरुवात 30 मार्च 2020 ला सुरु झाली. सुरुवातीला ती फक्त 90 दिवसांकरिता होती, परंतु पुढे 24 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आणि आता परत 20 एप्रिल 2021 रोजी ही योजना पुढचा एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे.

माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, 28 एप्रिल 2021 पर्यंत महाराष्ट्र सरकारने एकूण दोनशे दहा अर्ज या योजनेखाली केंद्र सरकारला पाठवले. परंतु त्यातील फक्त 58 अर्जदारांना विम्याचे पन्नास लाख रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. याचा अर्थ एकूण फक्त 27 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना याचा लाभ झाला आहे. 

जिल्ह्यांतील आकडेवारी पाहिली तर पुणे जिल्ह्याने सगळ्यात जास्त म्हणजे 47 अर्ज तर मुंबईतील महानगरपालिका बीएमसी यांनी 38 अर्ज केंद्र सरकारला पाठवले आहे.  आश्चर्य म्हणजे मुंबईत सगळ्यात जास्ती मृत्यूचा आकडा असून त्यानुसार अर्ज फारच कमी गेल्याचे दिसते. परंतु या अर्जांपैकी केंद्र सरकारने पुणे जिल्ह्यातील फक्त तीनच अर्ज मान्य केले तर मुंबईतील बावीस अर्ज मान्य करण्यात आले आहेत. 

महाराष्ट्रातील एकूण 19 डॉक्टरांचे अर्ज पाठवण्यात आले परंतु फक्त दहाच डॉक्टरांचे अर्ज मान्य करण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे मुंबईतील फक्त एकच डॉक्टरचा अर्ज पाठवण्यात आला आहे आणि तोही मान्य झालेला नाही. IMA अनुसार, महाराष्ट्रात 78 डॉक्टर्स मरण पावले आहेत. याचा अर्थ फक्तं काहीच डॉक्टरांना विम्याचा लाभ मिळाला आहे.  पूर्ण महाराष्ट्रात नऊ पैकी फक्त तीन नर्सेस यांना तर सहा पैकी तीन आशा कार्यकर्त्यांना विम्याची रक्कम मिळालेली आहेत.

The Young Whistleblowers NGO चे संस्थापक जितेंद्र घाडगे यांचे असे म्हणणं आहे की, आरोग्य विभागातील कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांना वाचवत आहेत. अशा वेळेस ज्या योद्ध्यांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्या कुटुंबांना देण्यात येणाऱ्या विमा रकमेत खूपच उशीर होत असून यामुळे सध्या कार्यरत असलेले आरोग्य कर्मचारी यांचं मनोबल कमी होण्याची शक्यता आहे. त्यांना आर्थिक संरक्षण देणं ही सरकारची प्रमुख जबाबदारी असून संबंधित अधिकाऱ्यांनी यात लक्ष देण्याची गरज आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ujjwal Nikam Loksabha Elections :  ठाकरेंच्या अंगणात महायुतीकडून  करेक्ट कार्यक्रम! निकमांना उमेदवारी?
Ujjwal Nikam Loksabha Elections : ठाकरेंच्या अंगणात महायुतीकडून करेक्ट कार्यक्रम! निकमांना उमेदवारी?
Salman Khan House Firing :   सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री; दोन्ही आरोपींची केली चौकशी
सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री; दोन्ही आरोपींची केली चौकशी
मूलबाळ होत नाही, तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा; महिलेच्या अंगावर मारले खिळे; संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
मूलबाळ होत नाही, तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा; महिलेच्या अंगावर मारले खिळे; संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
IPL 2024: Kavya Maran: हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ramdas Tadas Wardha Lok Sabha 2024 Phase 2 : मतदानानंतर रामदास तडस यांंचं कुटुंब 'माझा'वरBuldana Lok Sabha Election Voting : बुलढाण्यात रविकांत तुपकरांनी बजावला मतदानाचा हक्कYavatmal Lok Sabha 2024 Voting : यवतमाळमध्ये महायुतीचाच विजय होईल : Indranil NaikUjjwal Nikam Loksabha Elections :  ठाकरेंच्या अंगणात महायुतीकडून  करेक्ट कार्यक्रम! निकमांना उमेदवारी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ujjwal Nikam Loksabha Elections :  ठाकरेंच्या अंगणात महायुतीकडून  करेक्ट कार्यक्रम! निकमांना उमेदवारी?
Ujjwal Nikam Loksabha Elections : ठाकरेंच्या अंगणात महायुतीकडून करेक्ट कार्यक्रम! निकमांना उमेदवारी?
Salman Khan House Firing :   सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री; दोन्ही आरोपींची केली चौकशी
सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री; दोन्ही आरोपींची केली चौकशी
मूलबाळ होत नाही, तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा; महिलेच्या अंगावर मारले खिळे; संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
मूलबाळ होत नाही, तुझ्या अंगात तृतीयापंथीयाचा आत्मा; महिलेच्या अंगावर मारले खिळे; संभाजीनगरमधील संतापजनक प्रकार
IPL 2024: Kavya Maran: हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
हैदराबादची वाईट अवस्था पाहून काहीतरी बडबडली; काव्या मारनची रिॲक्शन व्हायरल, पाहा Video
Maharashtra Rain: महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान,  महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान, महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
ICC T20 World Cup 2024: हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
Maharashtra Weather : मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
Embed widget