एक्स्प्लोर
पेपर अवघड गेल्याने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
पेपर अवघड गेल्याने कोल्हापुरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.
![पेपर अवघड गेल्याने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या Engineering student suicide in Kolhapur latest update पेपर अवघड गेल्याने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/28161126/rahul-parekar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : पेपर अवघड गेल्याने कोल्हापुरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.
राहुल परेकर असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो कोल्हापुरातील तळसंदे इथल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. काल (शुक्रवार) त्याचा सीएमपीएस या विषयाचा पेपर होता. मात्र, हा पेपर अवघड गेल्यानं आपण आत्महत्या करत असल्याचं राहुलनं सुसाईड नोटमध्ये लिहलं आहे.
पेपर अवघड गेल्याने काल राहुल निराश झाला होता. त्यानंतर तो संध्याकाळी रूम बाहेर पडला. त्यानंतर तो रूमवर परतलाच नाही. आज (शनिवार) सकाळी त्याने कोल्हापुरातील टाकाळा येथे रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली.
राहुल हा मूळचा सोलापूरचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. दरम्यान, या घटनेची नोंद कोल्हापूर रेल्वे पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
क्राईम
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)